अहमदनगरात हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलेची हत्या, मध्यरात्री दगड घालून संपवलं
अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात 59 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. प्रवरा हॉस्पिटलसमोर असलेल्या हॉटेल पाकिजा येथे ही घटना घडली.
अहमदनगर : 59 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोक्यात दगड घालून महिलेची हत्या केल्याचा अंदाज आहे. अहमदनगर जिल्ह्यात प्रवरा हॉस्पिटलसमोर असलेल्या हॉटेलमध्ये ही घटना घडली.
काय आहे प्रकरण?
अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात 59 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. प्रवरा हॉस्पिटलसमोर असलेल्या हॉटेल पाकिजा येथे ही घटना घडली. डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा अंदाज आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हत्या झाल्याचा अंदाज असून सकाळी आठ वाजता ही घटना उघडकीस आली.
आरोपी शोधण्याचं आव्हान
अहमदनगर केडगाव येथे राहणाऱ्या अंजनाबाई मोहिते गेल्या पंधरा वर्षांपासून हॉटेलमध्ये कामाला होत्या. अज्ञातांच्या विरोधात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून आरोपीचा शोध घेण्याचं काम सुरु आहे. ही हत्या नेमकी कुठल्या कारणावरुन झाली आणि कोणी केली, याचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.
संबंधित बातम्या :
कीर्ती आनंदाने बिलगली, मात्र भावाने डोकं उडवल्यावर आई छाटलेल्या मुंडक्यालाही शिव्या घालत राहिली
तलवारीने केक कापून वाढदिवसाचे सेलिब्रेशन, औरंगाबादेत बर्थडे बॉयला अटक