निरोप समारंभ झाला, बदलीनंतर नव्या ठिकाणी रुजू होण्याआधी अहमदनगरात पोलिसाचा गळफास

पाच वर्षांपूर्वी समाधान भुतेकर यांची अहमदनगर शहर वाहतूक शाखेत नियुक्ती झाली होती. शहर वाहतूक शाखेतील पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची नुकतीच कोतवाली पोलिस ठाण्यात बदली झाली होती.

निरोप समारंभ झाला, बदलीनंतर नव्या ठिकाणी रुजू होण्याआधी अहमदनगरात पोलिसाचा गळफास
अहमदनगर पोलीस दलातील कर्मचाऱ्याची आत्महत्या
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 10:38 AM

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. समाधान अच्युतराव भुतेकर (वय 33 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. भुतेकर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. विशेष म्हणजे नुकतीच त्यांच्या बदलीचे आदेश आले होते, मात्र नव्या ठिकाणी रुजू होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या जीवनाची अखेर केली.

भुतेकर मूळ बुलडाण्याचे

पोलिस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येच्या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. मात्र भुतेकर यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. समाधान भुतेकर यांचे मूळ गाव बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यात आहे. ते नगर जिल्हा पोलिस दलात भरती झाले होते.

नव्या पोलीस स्टेशनला रुजू होण्याआधीच गळफास

पाच वर्षांपूर्वी भुतेकर यांची अहमदनगर शहर वाहतूक शाखेत नियुक्ती झाली होती. शहर वाहतूक शाखेतील पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची नुकतीच कोतवाली पोलिस ठाण्यात बदली झाली होती. शहर वाहतूक शाखेने त्यांना पाच ऑगस्टला निरोपही दिला होता.

समाधान अच्युतराव भुतेकर लवकरच कोतवाली पोलिस ठाण्यात रुजू होणार होते. मात्र गुरुवारी त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी टोकाचं पाऊल उचलण्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

अमरावतीत PSI ची आत्महत्या

दरम्यान, अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरिक्षक (PSI) पदावर कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनिल मुळे असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. या घटनेने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे.

मंगल कार्यालया समोरील झाडाला गळफास

अमरावती शहरात दोन हत्याकांडाच्या घटना ताज्या असतानाच पोलीस अधिकारी PSI अनिल मुळे यांनी आत्महत्या केली. यामुळे शहर हादरून गेलं आहे. अनिल मुळे हे पोलीस अधिकारी कटोरा नाका, रिंग रोड परिसरात वास्तव्यास होते. त्यांच्या राहत्या घरापासून जवळ गोल्डन लिफ मंगल कार्यालय आहे. त्या मंगल कार्यालया समोरील लेआऊटमधल्या निंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी जीवन यात्रा संपवली.

आत्महत्येचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलीस तपास करीत आहेत. अनिल मुळे हे सुरुवातीला गाडगे नगर पोलीस ठाण्यात, दुसऱ्यांदा राजापेठ पोलीस स्टेशन येथे, तर आता फ्रेजरपुरा येथे कार्यरत होते.

संबंधित बातम्या :

अमरावतीत पोलीस उपनिरिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या, विभागात खळबळ

बड्या पोलिस अधिकाऱ्याच्या दीड कोटींचं लाच प्रकरण, तपासात उकललं विवाहबाह्य संबंधातून झालेल्या एका हत्येचं गूढ

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.