Ahmednagar Robbery | तिघा वृद्धांना बेदम मारहाण, सोन्याच्या दागिन्यांची लूट, नगरमध्ये सहा दरोडेखोरांचा हैदोस

शुक्रवारी मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास अहमदनगरमधील शेवगाव रोडवरील प्रेमश्री पेट्रोल पंपासमोर राहणाऱ्या लिंबाजी चितळे यांच्या घरावर सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकला.

Ahmednagar Robbery | तिघा वृद्धांना बेदम मारहाण, सोन्याच्या दागिन्यांची लूट, नगरमध्ये सहा दरोडेखोरांचा हैदोस
अहमदनगरमध्ये दरोडा
Follow us
| Updated on: Dec 10, 2021 | 1:36 PM

अहमदनगर : अहमदनगरमधील पाथर्डी शहर हद्दीतील चितळे वस्तीवर सहा जणांनी दरोडा (Ahmednagar Robbery) टाकला. यावेळी दरोडेखोरांनी तीन वयोवृद्ध नागरिकांना जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोन्याच्या दागिन्यांसह 20 हजार रुपयांची रोख रक्कम आरोपींनी लांबवली आहे.

कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण

लिंबाजी नाथ चितळे (वय 65 वर्ष), बाबुराव गुणाजी उळगे (वय 65 वर्ष) आणि कमलबाई लिंबाजी चितळे (वय 58 वर्ष) असं मारहाण झालेल्या वृद्ध व्यक्तींची नावं आहेत. दरोडेखोरांनी त्यांना कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली. या मारहाणीत लिंबाजी नाथ चितळे हे गंभीर जखमी झाले असून अत्यवस्थ असल्याची माहिती आहे. जखमींच्या डोक्याला जबर मार लागला असून हात फ्रॅक्चर झाले आहेत. या प्रकरणी पाथर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास शेवगाव रोडवरील प्रेमश्री पेट्रोल पंपासमोर राहणाऱ्या लिंबाजी चितळे यांच्या घरावर सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी आधी बाहेर झोपलेल्या कमलबाई चितळे यांना जबर मारहाण केली. त्यानंतर घराचा दरवाजा तोडून घरात झोपलेल्या लिंबाजी चितळे, बाबुराव गुणाजी उळगे, लक्ष्मीबाई उळगे यांच्यापैकी लिंबाजी आणि बाबुराव यांना जबर मारहाण केली.

लक्ष्मीबाई उळगे (वय 60 वर्ष) यांच्याकडील गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील सोन्याचे दागिने दरोडेखोरांना काढून घेतले. त्यांना मात्र दरोडेखोरांनी मारहाण केली नाही.

संबंधित बातम्या :

बांधकामाच्या ठिकाणी वर्षभराच्या चिमुकलीला ठेवले, सिमेंटच्या ट्रकनं केला तिचा चेंदामेंदा!

मैत्रिणीला परीक्षेत मदत केल्याचा राग, तिघांचा तरुणावर चाकूहल्ला

कर्नाटकातून आलेल्या हल्लेखोराने का केला हल्ला? कारण सांगण्यास पोलिसांचा नकार, डॉ. राफे खून प्रकरण!

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.