घरदार, पोटपाणी जिच्यावर चालत होतं, त्याच एसटीत चालकाचा गळफास, एसटीला गाळातून कोण बाहेर काढणार?
संगमनेर बस स्थानकात एसटी बसमध्येच चालकाने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पाथर्डी-नाशिक बसच्या वाहन चालकाने बसमध्येच गळफास घेतला.
अहमदनगर : एसटी बस चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बस स्थानकात बसमध्येच ड्रायव्हरने आपलं आयुष्य संपवलं. कर्जबाजारीपणातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
नेमकं काय घडलं?
संगमनेर बस स्थानकात एसटी बसमध्येच चालकाने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पाथर्डी-नाशिक बसच्या वाहन चालकाने बसमध्येच गळफास घेतला. पाथर्डी बस स्थानकातील चालक सुभाष तेलोरे यांनी आपलं आयुष्य संपवलं. मुक्कामी थांबलेल्या बसमध्येच त्यांनी सकाळी गळफास घेतल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण?
डोक्यावर कर्ज वाढल्याने सुभाष तेलोरे यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बस स्थानकात डिझेल नसल्याने नाशिकला न जाता संगमनेरला बस मुक्कामी होती. मुक्कामी थांबलेल्या बसमध्येच त्यांनी सकाळी गळफास घेतला.
धुळ्यात एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या
दुसरीकडे, पगार वेळेवर होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या एसटी (राज्य परिवहन मंडळ) चालकाने नैराश्येतून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील साक्री इथे घडली. आधीच तुटपुंजा पगार आणि तोही अनियमित असल्यामुळे शेवटी कंटाळून कमलेश बेडसे यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले होते. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.
पती निधनानंतर पत्नीची आत्महत्या
दरम्यान, कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षक पतीचा विरह सहन न झाल्यामुळे शिक्षिका असलेल्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. 18 महिन्याच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन महिलेने आपलं आयुष्य संपवलं. बीडमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
एक महिन्यांपूर्वी कोरोनाने शिक्षक असलेल्या पतीचा मृत्यू झाला. पतीविरह सहन न झाल्याने शिक्षिका असलेल्या पत्नीने तिच्या 18 महिन्याच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील बानेगाव इथे घडली आहे.
माहेरी येऊन लेकीसह आत्महत्या
शीतल राजाभाऊ जाधवर आणि शांभवी अशी मृत मायलेकींची नावं आहेत. राजाभाऊ आणि शीतल जाधवर हे दोघेही पती पत्नी पुणे येथे पेशाने शिक्षक होते. पतीच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या शिक्षिका पत्नीने आपल्या मुलीसह माहेरी येऊन हे टोकाचे पाऊल उचलल्याने बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
संबंधित बातम्या :
कोरोनाने पतीचा अखेरचा श्वास, दोन मुलींना घरी ठेवून पत्नीची मुलासह आत्महत्या
कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात, पतीची प्रकृती चिंताजनक, धसक्याने वसईत विवाहितेची आत्महत्या
पती निधनानंतर 22 वर्षीय पत्नीची आत्महत्या, विरारमध्ये दाम्पत्याचा करुण अंत
पगार न मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या, एसटी संघटनेकडून आंदोलनाची हाक