एक लाखांची उधारी झेपेना, पालकांनी पोटची पोरं पाठवली, दोघींनी औरंगाबादेत चिमुकल्यांना भीक मागायला बसवलं
मुलांच्या पालकांकडून प्रत्येकी 50 हजार रुपये येणे बाकी आहेत, म्हणून त्यांची मुलं आणली असल्याचे महिलांनी सांगितले. तसेच, तशा प्रकारचा बॉण्ड केल्याचाही दावा दोघींनी केला. औरंगाबादेत हा प्रकार घडला आहे
औरंगाबाद : एक लाख रुपये परत मिळवण्यासाठी अकोल्याहून दोन महिलांनी दोन चिमुकल्यांना शहरात आणून भीक मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जनाबाई (वय 65 वर्ष) आणि सविता (वय 35 वर्ष) (दोघी रा. मुकुंदवाडी) यांना अटक केली आहे. अटकेत असलेल्या दोन्ही महिला सात महिन्यांपूर्वी अकोला जिल्ह्यातील राहुल पगारे आणि शेख पाशा यांच्याकडून या मुलांना आणल्याचे पोलिसांना सांगत आहेत.
नेमकं काय घडलं?
मुकुंदवाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शिवराज नाथाजी वीर (वय 47) यांनी दोन दिवसांपासून या महिला दोन्ही मुलांना मारहाण करत असल्याचे पाहिले होते. या प्रकरणी वीर यांनी महिलांना हटकल्यानंतर त्यांनी या मुलांच्या पालकांकडून प्रत्येकी 50 हजार रुपये येणे बाकी आहेत, म्हणून त्यांची मुलं आणली असल्याचे सांगितले. तसेच तसा बॉण्ड केल्याचाही दावा केला.
उधारीऐवजी मुलांना सोपवलं
शिवराज वीर यांनी या घटनेची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना दिल्यावर पोलिस निरीक्षक मनोज पगारे, उपनिरीक्षक भराटे यांच्या पथकाने दोन्ही महिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पालकांना जास्तीची मुले असल्यामुळे त्यांनी उधारी देण्याऐवजी मुलांना आमच्या हवाली केले असल्याचे सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक भराटे करत आहेत.
चेन्नईत आईच्या परवानगीने दुकानदाराचा मुलीवर बलात्कार
दुसरीकडे, कर्नाटकच्या म्हैसुरुमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचा प्रकार ताजा असताना, तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिशीच्या आत वय असलेल्या दोघी बहिणींनी एका दुकानदाराला आपल्याच अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्याची परवानगी दिली आणि त्याचे व्हिडिओही रेकॉर्ड करु दिले. दुकानातून खरेदी केलेल्या सामानाच्या मोबदल्यात त्यांनी ही घृणास्पद डील केल्याचा आरोप आहे. दुकानदाराने बहिणींच्या अल्पवयीन मुलींच्या तीन मैत्रिणींवरही बलात्कार करुन त्याचे चित्रीकरण केल्याचा दावा केला जात आहे.
तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रेत्यांचा तपशील मिळवण्यासाठी जप्त केलेला दुकानदाराचा मोबाईल फोन तपासल्यावर पोलिसांना धक्काच बसला. मोबाईलच्या फोटो गॅलरीमध्ये त्यांना एका पुरुषाने लहान मुलांवर केलेल्या लैंगिक अत्याचाराचे सुमारे 50 व्हिडिओ आढळले. पोलिसांना सुरुवातीला वाटले की दुकानदाराने चाईल्ड पॉर्न डाऊनलोड केले आहे. मात्र व्हिडीओ क्लिपमध्ये दिसणारी व्यक्ती ही खुद्द दुकानदार पेरुमल असल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर पेरुमलला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार चौकशी दरम्यान त्याने पोलिसांना सांगितले, की तो पाच अल्पवयीन मुलांवर गेल्या सहा महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होता.
संबंधित बातम्या :
खरेदी झाली, पैसे नव्हते, तिशीतील बहिणींच्या परवानगीने दुकानदाराचा अल्पवयीन मुलींवर बलात्कार