VIDEO | कुटुंब रंगलंय ‘Fighting’मध्ये, मुलगी-मामा आणि आई, औरंगाबादेत भररस्त्यात हातघाई
औरंगाबाद शहरातील वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोर दोन महिला आणि एक पुरुष यांची आपापसात हातघाई झाल्याचा प्रकार पाहायला मिळाला. नंतर हे तिघे एकमेकांचे नातेवाईक असल्याचं समोर आलं
औरंगाबाद : घरातील सदस्यांमध्ये असलेले वाद चव्हाट्यावर आल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये चक्क माय-लेक आणि मामा एकेमकांना भिडल्याचं दृश्य पाहायला मिळालं. आईसोबत मुलगी राहायला तयार नसल्यावरुन हा राडा झाला होता. विशेष म्हणजे पोलीस स्टेशनच्या समोरच हा गोंधळ झाला. भांडणाची ही दृश्यं कॅमेरामध्ये कैद झाली आहेत.
नेमकं काय घडलं?
औरंगाबाद शहरातील वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोर दोन महिला आणि एक पुरुष यांची आपापसात हातघाई झाल्याचा प्रकार पाहायला मिळाला. हे तिघे एकमेकांचे नातेवाईक असल्याचं समोर आलं. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या आई, मुलगी आणि मामा अशा तिघा जणांमध्ये मारहाण झाल्यामुळे बराच काळ गोंधळ उडाला होता.
आईने मारहाण केल्याचा आरोप
पोलिसांनी तिघाही जणांना ताब्यात घेऊन भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. वाळूज पोलीस स्टेशनच्या गेट समोर असलेल्या पार्किंगमध्ये ही हाणामारी झाली. आईसोबत राहायला तयार नसलेल्या मुलीला आणि तिच्या मामाला आईनेच मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या राड्याची दृश्यं कॅमेरामध्ये कैद झाली आहेत.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
रिक्षाला वाचवताना फॉर्च्युनर दुभाजकावर आदळली, 3 ते 4 वेळा उलटली, एकाचा मृत्यू
नाशिकच्या सिडको परिसरात आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह; घातपाताचा संशय
आईने केला पोटच्या पोराचा सौदा; पोलीस बनले ग्राहक, सहा जणांना अटक