पेट्रोल न दिल्याचा राग, औरंगाबादेत 31 वर्षीय तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

आणखी पेट्रोल देण्यास नकार दिल्याच्या रागातून तिघांनी तरुणाला जिवंत जाळल्याची घटना औरंगाबादमध्ये उघडकीस आली आहे. पेटवण्यात आलेल्या तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.

पेट्रोल न दिल्याचा राग, औरंगाबादेत 31 वर्षीय तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
औरंगाबादमध्ये तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 8:28 AM

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील गारखेडा परिसरात पेट्रोल देण्याच्या कारणावरून एका तरुणाला चक्क जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिनेश देशमुख असं पेटवण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर भागवत सर्जेराव गायकवाड, नितीन प्रभाकर सोनवने आणि बालाजी तुकाराम गाडगीळ अशी आरोपींची नावे आहेत. या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पेटवण्यात आलेल्या तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.

काय आहे प्रकरण?

दिनेश रुस्तमराव देशमुख (वय 31 वर्ष, रा. मोतीनगर) हा गंभीर जखमी झाला होता. दिनेश खासगी वाहनावर चालक आहे. 19 सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे तो घरातून बाहेर पडला. सकाळी 11 वाजताच्या सुमारास त्याचा मित्र किरण गाडगिडे त्याला भेटायला गेला. घराजवळील रिकाम्या प्लॉटवर गप्पा मारत दोघांनी दारु प्यायली.

नेमकं काय घडलं?

दुपारी एक वाजताच्या सुमारास तिथे नितीन सोनवणे आणि भागवत गायकवाड आले. यावेळी नितीनने कामावर जाण्यासाठी पेट्रोल दे, अशी मागणी केली. किरणने दिनेशला पेट्रोल देण्यासाठी सांगितले. त्याने थोडेच पेट्रोल देण्याची तयारी दर्शवली, पण आणखी जास्त पेट्रोलची मागणी नितीनने केली. तेव्हा दिनेशने स्पष्ट नकार दिला. त्याचा राग आल्याने भागवतच्या इशाऱ्यावरून नितीनने काढलेले पेट्रोल दिनेशच्या अंगावर फेकले.

एकाने पेट्रोल फेकले, दुसऱ्याने काडी शिलगवली

ज्याच्यासोबत दारु प्यायली, त्या किरणने त्याच वेळी जवळच्या किराणा दुकानातून काडेपेटी आणली आणि काडी पेटवून दिनेशच्या अंगावर फेकली. त्या वेळी एकदम भडका उडाला आणि दिनेश गंभीर भाजला गेला. हा प्रकार कळताच स्थानिक, कुटुंबीयांनी धाव घेतली दिनेशला खासगी रुग्णालयात दाखल केले.

चोवीस तासांत आरोपींना अटक

दरम्यान या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने भागवत सर्जेराव गायकवाड (वय 26 वर्ष), नितीन प्रभाकर सोनवने (वय 27 वर्ष), बालाजी तुकाराम गाडगीळ (वय 28 वर्ष) सर्व रा. न्यू मोतीनगर गारखेडा यांना अटक केली. ही कारवाई पुंडलिकनगरचे सहायक पोलीस निरीक्षक शेषराव खटाणे, बाळाराम चौरे, गणेश वैराळकर, राजेश यदमळ, विलास डोईफोडे, अजय कांबळे, मांटे, कल्याण निकम यांनी केली.

अनैतिक संबंधाच्या रागातून वर्गमित्राचा खून

दरम्यान, सातारा जिल्ह्यात तलवारीने वार करुन झालेल्या हत्येप्रकरणी कराड तालुका पोलिसांनी 24 तासात चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. अनैतिक संबंधाच्या रागातून वर्गमित्रानेच तीन साथीदारांच्या मदतीने तरुणाचा खून केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी चौघांना अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले असता पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

संबंधित बातम्या :

भाजीविक्रेत्याच्या हत्येचं गूढ उलगडलं, अनैतिक संबंधाच्या रागातून वर्गमित्राकडून खून

40 वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्राने भोसकून हत्या, सलग दुसऱ्या दिवशी हत्येच्या घटनेने कराड हादरलं

संतापजनक! आधी त्यानं मुलीचा गळा चिरला, नंतर थेट पोलीस ठाण्यात गेला, महाराष्ट्र हादरला

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.