अवघ्या तीन सेकंदात तरुणाचा जीव घेतला, औरंगाबादेत कुख्यात गुन्हेगार चोवीस तासात जेरबंद

कुख्यात गुन्हेगाराला औरंगाबादेतील सिडको पोलिसांनी चोवीस तासात जेरबंद केले. रविवारी रात्री सिडको, एन-8 भागातील विश्वास वाईन शॉपवर सिद्धार्थ हिवराळे याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती.

अवघ्या तीन सेकंदात तरुणाचा जीव घेतला, औरंगाबादेत कुख्यात गुन्हेगार चोवीस तासात जेरबंद
खेडमधील हत्येचे गूढ उकलले; सोन्याच्या दागिन्यांसाठी केली वृद्धाची हत्या
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 4:00 PM

औरंगाबाद : दारु विकत घेणाऱ्या तरुणाची पोटात चाकू खुपसून हत्या करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. जुन्या वादातून कुख्यात गुन्हेगाराने तरुणाची हत्या केल्याचा आरोप आहे. अवघ्या तीन सेकंदात चाकूने भोसकून औरंगाबादेतील तरुणाची हत्या करण्यात आली होती.

पूर्ववैमनस्यातून हत्येचा आरोप

कुख्यात गुन्हेगाराला औरंगाबादेतील सिडको पोलिसांनी चोवीस तासात जेरबंद केले. रविवारी रात्री सिडको, एन-8 भागातील विश्वास वाईन शॉपवर सिद्धार्थ हिवराळे याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा आरोप आहे. दारु विकत घेत असताना सिद्धार्थ आरोपीने अवघ्या तीन सेकंदात चाकूने मारले होते.

चाकू हल्ल्यानंतर आरोपीचे पलायन

जखमी अवस्थेत त्या व्यक्तीला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. चाकू हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला होता. या प्रकरणी पोलिसांकडून कुख्यात गुन्हेगार विशाल राम आगळे याला जाधववाडीतून अटक करण्यात आली आहे.

औरंगाबादेत प्राध्यापकाची क्रूर हत्या

दुसरीकडे, शहराला हादरवून टाकणारी अत्यंत क्रूर हत्या औरंगाबादेत रविवारी रात्री घडली होती. या हत्येतील घटनाक्रम आणि खून कसा झाला, याची माहिती उघड झाल्यानंतर अनेकांच्या अंगाचा थरकाप उडाला. शहरातील मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. राजन हरिभाऊ शिंदे यांची इतक्या क्रूरपणे हत्या केलीय की, ते ऐकतानाही मन सुन्न होतं.

मुकुंदवाडी पोलिसात डॉ. राजन शिंदे यांच्या पत्नी डॉ. मनिषा शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सिडको येथील संत तुकोबा नगरात डॉ. राजन शिंदे, पत्नी डॉ. मनिषा शिंदे, मुलगी चैताली (20), मुलगा रोहित (17), सासरे हरिभाऊ आणि सासू चंद्रकला यांच्यासह राहत होते. रविवारी संध्याकाळी साडे नऊ वाजता घरातील सासू-सासरे, जेवण करून त्यांच्या खोलीत झोपी गेले. मुलगी, मुलगा जागेच होते.

राजन हे मित्राला भेटण्यासाठी बाहेर गेले होते. रात्री साडेअकरा वाजता ते बाहेरून जेवण करून घरी आले. त्यानंतर पती-पत्नींनी रात्री एक वाजेपर्यंत टीव्ही पाहिला. मनिषा रात्री एक वाजता खोलीत झोपण्यासाठी गेल्या. मुलांनाही झोपायला सांगितले. पती राजन हे हॉलमध्ये टाकलेल्या अंथरुणावर पडून टीव्ही पाहत होते. पण मनीषा सकाळी सव्वा सहा वाजता उठून हॉलमध्ये आल्या, तेव्हा त्यांना डॉ. राजन हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्या शेजारी मुलगा आणि मुलगी दोघेही नव्हते.

संबंधित बातम्या :

थरकाप उडवणारा खून, नसा कापल्या, कान छाटले, डोक्यात हातोड्याचे वार, छातीवर बसून गळा चिरला, औरंगाबाद हादरलं!

उल्हासनगरात वालधुनी नदीत अज्ञात मृतदेह, परिसरात खळबळ, हत्या की आत्महत्या, गूढ कसं उलगडणार?

मुलाच्या काळजीमुळे अचानक यूटर्न, दोघांचा बळी घेणाऱ्या अपघातानंतर कार चालकाचा दावा

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.