नियतीने तीन लेकरांचा घास घेतला, विषबाधेने दोन बहिणींपाठोपाठ भाऊही दगावला, आई गंभीर

जेवणातून एकाच कुटुंबातील चौघा जणांना विषबाधा झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये आधी दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला होता, नंतर धाकटा भाऊही दगावला, तर महिलेची प्रकृती गंभीर आहे.

नियतीने तीन लेकरांचा घास घेतला, विषबाधेने दोन बहिणींपाठोपाठ भाऊही दगावला, आई गंभीर
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 2:22 PM

बीड : दोन बहिणी आणि भाऊ अशा तिघा सख्ख्या भावंडाचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जेवणातून एकाच कुटुंबातील चौघा जणांना विषबाधा (Food Poison) झाली होती. या घटनेत आधी दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू (Sisters Death) झाला, तर त्यांच्या पाठोपाठ आठ महिन्यांच्या भावानेही अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आईची प्रकृती गंभीर आहे. बीड जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 6 वर्षीय साधना, 4 वर्षीय श्रावणी आणि आठ महिन्यांच्या नारायणचा मृत्यू झाला, तर आई भाग्यश्री धारासुरेवर उपचार सुरु आहेत. बीडमधील अंबाजोगाई (Ambajogai Beed) तालुक्यातील बागझरी येथे ही घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. माऊलीवर आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून तिचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. मात्र विषबाधेचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

काय आहे प्रकरण?

जेवणातून एकाच कुटुंबातील चौघा जणांना विषबाधा झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये आधी दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला होता, नंतर धाकटा भाऊही दगावला, तर महिलेची प्रकृती गंभीर आहे.

चिमुकल्यांचा मृत्यू, मायलेकावर उपचार

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी येथे तीन बालकांचा विषबाधेने मृत्यू झाला आहे. काशीनाथ दत्तू धारासुरे यांच्या दोन मुलींपाठोपाठ आठ महिन्याचा मुलगा नारायण याचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे विषबाधा प्रकरणातील मृत्यूंची संख्या आता तीनवर गेली आहे. या तिन्ही बालकांची आई भाग्यश्री यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असून त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रात्रीच्या जेवणानंतर त्यांची पत्नी भाग्यश्री, मुली साधना आणि श्रावणी आणि मुलगा नारायण याला विषबाधा झाली असावी. असा अंदाज वर्तविला जात आहे. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर चौघांना स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र साधना 6, श्रावणी 4 आणि 8 महिन्याचा नारायण याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला असून आई भाग्यश्री यांची प्रकृती चिंताजनक आहे.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी येथे ही घटना घडली आहे. धारासुरे कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला असून यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

विषबाधेचं कारण अद्याप अस्पष्ट

महिलेवर आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. चौघा जणांना विषबाधा कशामुळे झाली, याचं कारण अद्याप समजलेलं नाही.

संबंधित बातम्या :

बीडमधील नोंदणी ऑफिसबाहेर गोळीबार, शिवसेना नेत्या पिता-पुत्रावर गुन्हा

एकाच दिवशी शिक्षक-शेतकऱ्यासह तिघांची आत्महत्या, माजलगावात खळबळ

मानलेल्या आईच्या सांगण्यावरुन बायकोला मारहाण, राष्ट्रवादीच्या बीड महिला जिल्हाध्यक्षावर गुन्हा

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.