बहिणीच्या दुसऱ्या लग्नाला आक्षेप, भावाचा प्राणघातक हल्ला, ताईसह होणारा नवरा गंभीर जखमी
बीड शहरात एका तरुणाने आपल्या सख्ख्या बहिणीवर प्राणघातक हल्ला केल्याने एकच खळबळ माजली आहे. वर्दळीच्या ठिकाणी हा हल्ला घडल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
![बहिणीच्या दुसऱ्या लग्नाला आक्षेप, भावाचा प्राणघातक हल्ला, ताईसह होणारा नवरा गंभीर जखमी बहिणीच्या दुसऱ्या लग्नाला आक्षेप, भावाचा प्राणघातक हल्ला, ताईसह होणारा नवरा गंभीर जखमी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/02/28163333/Beed-Sister-Brother-in-law-Attack.jpg?w=1280)
बीड : तरुणाने आपल्या सख्ख्या बहिणीवर प्राणघातक हल्ला (Attack) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बहिणीचे दुसरे लग्न (Second Marriage) मान्य नसल्याने त्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात आरोपीची बहीण रुपाली नरवडे आणि तिचा होणारा नवरा योगेश बागडे हे दोघेही गंभीररित्या जखमी झाले आहेत. बीड (Beed Crime) जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. रुपाली आणि योगेश आज विवाहबंधनात अडकणार होते. लग्नाची खरेदी करण्यासाठी रविवारी दोघं बाजारपेठेत गेले होते. यावेळी आरोपी भावाने दोघांवर जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यात बहीण आणि तिचा होणारा नवरा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बीड शहर पोलिस आरोपी धनंजय बनसोडे याचा शोध घेत आहेत.
काय आहे प्रकरण?
बीड शहरात एका तरुणाने आपल्या सख्ख्या बहिणीवर प्राणघातक हल्ला केल्याने एकच खळबळ माजली आहे. वर्दळीच्या ठिकाणी हा हल्ला घडल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. बहिणीचे दुसरे लग्न मान्य नसल्याने सख्ख्या बहिणीवर भावाने हल्ला चढवल्याचा आरोप आहे.
ताई आणि होणारा नवरा गंभीर
या हल्ल्यात रूपाली नरवडे आणि योगेश बागडे हे दोघेही गंभीररित्या जखमी झाले आहेत. रुपाली आणि योगेश या दोघांचा विवाह आज होणार होता. आणि त्याच लग्नाची खरेदी करण्यासाठी हे दोघेही रविवारी शहरातील बाजारपेठेत आले होते.
आरोपी भाऊ पसार
बाजारात आलेल्या बहिणीवर आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्यावर भावाने हल्ला केला. हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी असून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर बीड शहर पोलिस आरोपी धनंजय बनसोडे याचा शोध घेत आहेत.
संबंधित बातम्या :
प्रेम विवाहानंतरही बायकोचं एक्स-बॉयफ्रेण्डशी लफडं सुरु, चिडलेल्या नवऱ्याकडून जन्माची अद्दल
CCTV | कार पार्किंगवरुन बाचाबाची, मुरबाडमध्ये डॉक्टरवर कोयत्याने हल्ला