एकाच दिवशी शिक्षक-शेतकऱ्यासह तिघांची आत्महत्या, माजलगावात खळबळ

नैराश्यातून शिक्षकाने जीव दिल्याचं समोर आलं आहे. तर व्यवहारातील आर्थिक जाचास कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेतला. तरुणाच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजलं नाही.

एकाच दिवशी शिक्षक-शेतकऱ्यासह तिघांची आत्महत्या, माजलगावात खळबळ
बीडमधील माजलगाव तालुक्यात एकाच दिवशी तीन आत्महत्या
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 10:27 AM

बीड : गेल्या 24 तासांत शिक्षक आणि शेतकऱ्यासह तिघा जणांनी आत्महत्या (Suicide) केल्याच्या घटनांनी बीड (Beed) जिल्ह्यातील माजलगाव तालुका अक्षरशः हादरून गेला आहे. शिक्षक सुरेश बडे, शेतकरी रामचंद्र गरुड आणि कृष्णा कोके या तरुणाने आपल्या आयुष्याची अखेर केली. या तिघांनीही गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. नैराश्यातून शिक्षकाने जीव दिल्याचं समोर आलं आहे. तर व्यवहारातील आर्थिक जाचास कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेतला. तरुणाच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजलं नाही.

शिक्षकाचा घरात गळफास

पहिली घटना, शहरालगत असणाऱ्या केसापुरी कॅम्प येथे घडली. सुरेश रामकिसन बडे (वय 37, रा. गावंदरा ता. धारूर) हे शिक्षक तिथे राहत होते. त्यांनी नैराश्यातून गुरुवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास आत्महत्या केली. घरातील लोखंडी आडूला गळफास घेऊन त्यांनी जीवनयात्रा संपवली. ही घटना सकाळी त्यांचे चुलते सुभाष श्रीरंग बढे यांच्या निदर्शनास आली. त्यांच्या माहितीवरुन माजलगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणाचा बेल्टने गळफास

दुसरी घटना, राजेवाडी येथे कृष्णा बालासाहेब कोके (वय 19 वर्षा) या युवकाने आत्महत्या केली. बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कमरेला असलेल्या बेल्टच्या सहाय्याने त्याने राहत्या घरी गळफास घेतला. मात्र कृष्णाच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी दिंद्रुड पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

शेतकऱ्याची लिंबाच्या झाडाला लटकून आत्महत्या

तिसरी घटना, राजेगाव येथील रामचंद्र धुराजी गरड (वय 40 ) या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची आहे. व्यवहारातील आर्थिक जाचास कंटाळून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून त्यांनी आयुष्याची अखेर केली. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण ठाण्यात अकस्मात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत आत्महत्येच्या तीन घटना घडल्याने माजलगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या :

“मला त्याच्याकडे जायचंय…” मित्राच्या निधनाचा धक्का पचेना, 28 वर्षांच्या तरुणाची आत्महत्या

रस्त्याच्या कडेला रिक्षा लावली आणि… बदलापुरात तरुण रिक्षा चालकाची आत्महत्या

महिला हेड कॉन्स्टेबलसह पती राहत्या घरी मृतावस्थेत, शाळेतून घरी परतलेल्या मुलासमोर भयंकर दृश्य

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.