अंजली पाटलांना माझं राजकारण संपवायचंय, माझ्या सुनेच्या खांद्यावर बंदूक, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांचा प्रत्यारोप

संगीता तुपसागर बीड जिल्हा राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा आहेत. सुनेचा छळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

अंजली पाटलांना माझं राजकारण संपवायचंय, माझ्या सुनेच्या खांद्यावर बंदूक, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांचा प्रत्यारोप
बीडमधील राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा Image Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 11:37 AM

बीड : “माझ्या सुनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून माझं राजकारण संपवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. माझी सून याबाबत अनभिज्ञ असून आमच्यात कसलाही कौटुंबिक वाद नाही” असा दावा राष्ट्रवादीच्या बीड महिला जिल्हाध्यक्षांनी (Beed NCP) केला आहे. माझे सहकारी पदाधिकारीच कट कारस्थान रचत असल्याचा गंभीर आरोप संगीता तुपसागर (Sangeet Tupsagar) यांनी केला आहे. मानलेल्या आईच्या सांगण्यावरुन भुजंग भुतावळे याने बायकोला मारहाण (Physical Assault) केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर सुनेचा छळ केल्याप्रकरणी संगीता तुपसागर यांच्यावर अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेचा पती भुतावळे आणि मानलेल्या सासू तुपसागर या दोघांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर तुपसागर यांनी माध्यमांसमोर येऊन सहकाऱ्यांवरच प्रत्यारोप केले आहेत.

संगीता तुपसागर बीड जिल्हा राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा आहेत. सुनेचा छळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर संगीता तुपसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

महिला सहकारी पदाधिकाऱ्यांवर आरोप

अंबाजोगाईच्या राष्ट्रवादी तालुका अध्यक्षा अंजली पाटील यांना माझे राजकरण संपवायचे आहे, त्यामुळे माझ्या सुनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला बदनाम करून माझे खच्चीकरण करण्याचा षडयंत्र आहे. मी काहीही चुकीचे वागले नाही. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. असा आरोप संगीता तुपसागर यांनी केला आहे.

पोलीस अधीक्षांकडे तक्रार

कसलीही चौकशी न करता माझ्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हा गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी संगीता तुपसागर यांनी पोलीस अधीक्षक आर राजा यांच्याकडे केली आहे. तसे निवेदन देखील देण्यात आले आहे.

राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

राष्ट्रवादीच्या महिला बीड जिल्हाध्यक्षा संगीता तुपसागर यांची निवड झाल्यानंतर अनेक महिला पदाधिकारी नाराज आहेत. तुपसागर ह्या मूळच्या कळंब येथील आहेत. त्यांचे वडील माजी आमदार आहेत. मात्र कमी काळात बीड जिल्ह्यात ठसा उमटवल्याने राष्ट्रवादीकडून त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे स्थानिक पातळीवरील वाद चव्हाट्यावर आला होता.

संबंधित बातम्या :

मानलेल्या आईच्या सांगण्यावरुन बायकोला मारहाण, राष्ट्रवादीच्या बीड महिला जिल्हाध्यक्षावर गुन्हा

पत्नीची इच्छा नसताना हात-पाय बांधून शारीरिक संबंध हे क्रौर्यच, नागपूर कोर्टाकडून घटस्फोट मंजूर

पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्याशिवाय दुसरी बायको पेन्शनसाठी पात्र नाही, हायकोर्टाचा निर्णय

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.