बीडमधील नोंदणी ऑफिसबाहेर गोळीबार, शिवसेना नेत्या पिता-पुत्रावर गुन्हा

बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मुद्रांक आणि नोंदणी ऑफिसबाहेर शुक्रवारी झालेल्या गोळीबारात दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सतीश बबन क्षीरसागर आणि फारुक सिद्दीकी अशी या घटनेतील जखमींची नावं आहेत.

बीडमधील नोंदणी ऑफिसबाहेर गोळीबार, शिवसेना नेत्या पिता-पुत्रावर गुन्हा
बीडमध्ये दोघांवर गोळीबार
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 11:42 AM

बीड : बीड शहरातील जिल्हाधिकारी (Beed collector office) कार्यालय परिसरातील मुद्रांक आणि नोंदणी ऑफिसबाहेर गोळीबार (Firing) झाल्याची घटना काल उघडकीस आली होती. या प्रकरणी शिवसेना (Shiv Sena) नेत्या पिता पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन खरेदी विक्रीच्या वादातून मुद्रांक विभाग कार्यालयाजवळ शुक्रवारी सकाळी अकरा वाजता हा प्रकार घडला होता. बीडमधील गोळीबारात दोघे जण जखमी झाले होते. जखमींवर सध्या औरंगाबाद येथे उपचार सुरु आहेत. या प्रकरणी शिवसेना नेते भारतभूषण क्षीरसागर आणि त्यांचे पुत्र योगेश क्षीरसागर यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र शिवसेना पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

काय आहे प्रकरण?

बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मुद्रांक आणि नोंदणी ऑफिसबाहेर शुक्रवारी झालेल्या गोळीबारात दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सतीश बबन क्षीरसागर आणि फारुक सिद्दीकी अशी या घटनेतील जखमींची नावं आहेत. गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता. क्षणभर काय झालं ते कुणाला कळलंच नाही. नंतर जखमी झालेल्या दोघांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. घटनास्थळी काही काळ तणावाचं वातावरण होतं, पोलीस दाखल झाल्यानंतर ताण निवळला.

नेमकं काय घडलं?

25 फेब्रुवारी रोजी हे दोघे सकाळी मुद्रांक व नोंदणी कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांच्या दिशेने गोळीबार झाला. काही  वेळातच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. जखमींना जिल्हा रुग्णालयात भर्ती करण्यात आलं. प्राथमिक चौकशीनुसार, जमिनीच्या व्यवहारातून हा प्रकार घडल्याची माहिती हाती आली आहे.

घटनास्थळी तणावपूर्ण शांतता

बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली. पोलीस अधीक्षक आर राजा, अप्पर पोलीस सुनील लांजेवर यांच्यासह प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक रश्मीथा एन राव यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच येथे दंगल नियंत्रण पथकदेखील दाखल झाले. पोलिसांना हा परिसर सील केला असून पुढील तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या

बीडमध्ये गोळीबाराच्या घटनेनं खळबळ, रजिस्ट्री कार्यालय परिसरात दोघे जखमी, काय घडलं?

एकाच दिवशी शिक्षक-शेतकऱ्यासह तिघांची आत्महत्या, माजलगावात खळबळ

खळबळजनक ! परळीत वृद्ध बहिण-भावाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, हत्येचे कारण अस्पष्ट

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.