सांगली : 12 कोटींचा व्हॅट थकवल्याचा आरोप, काँग्रेसच्या नेत्यासह वसंतदादा साखर कारखान्याच्या 16 संचालकांवर गुन्हे
सांगलीच्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या (Vasantdada Sugar Factory In Sangli) अध्यक्षांसह 16 संचालकांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.
सांगली : 12 कोटींचा व्हॅट थकवल्या प्रकरणी सांगलीच्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या (Vasantdada Sugar Factory In Sangli) अध्यक्षांसह 16 संचालकांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. सांगलीच्या जीएसटी विभागाकडून संजय नगर पोलीस ठाण्यामध्ये काँग्रेसचे नेते आणि अध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह संचालक मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत (Maharashtra Crime News Case Filed Against Chairman And Directors Of Vasantdada Sugar Factory In Sangli).
सांगलीच्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना
सांगलीच्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून कंट्री लिकरची निर्मिती करण्यात येते आणि त्याच्या विक्रीतून 2017 दरम्यान जमा झालेला व्हॅट कारखाना प्रशासनाकडून शासनाकडे करण्यात आलेला नाही. याबाबत सांगलीच्या जीएसटी कार्यालयाकडून व्हॅट भरण्याबाबतीत वारंवार वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाला सूचना देण्यात आल्या होत्या.
12 कोटी 44 लाख रुपयांचा व्हॅट थकवल्याचा आरोप
मात्र, कारखाना प्रशासनाकडून याबाबत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे जीएसटी विभागाच्या वतीने संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळांवर 12 कोटी 44 लाख रुपयांचा व्हॅट थकवल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
9 कोटी 8 लाख इतकी व्हॅटची मूळ रक्कम असून त्याचं व्याज 3 कोटी 36 लाख इतका आहे. असे एकूण 12 कोटी 44 लाखांची रक्कम कारखाना प्रशासनाने शासनाच्या तिजोरीत भरली नाही आणि त्यामुळे कारखान्याच्या संचालक मंडळाच्या विरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती जीएसटी सांगली विभागाच्या उपायुक्त शर्मिला मिस्किन यांनी दिली आहे.
गंगापूर साखर कारखाना विक्रीला
कित्येक कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यामुळे राज्यभर चर्चेत आलेला औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर साखर कारखाना (Gangapur Sugar Factory) अखेर विक्रीला काढण्यात आला आहे. राज्य सहकारी बँकेने हा कारखाना विक्रीला काढला असून तशी जाहिरातही वर्तमानपत्रांत देण्यात आलीये. सभासदांची देणी थकल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर साखर कारखान्यामध्ये कित्येक कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्यामुळे या कारखान्याच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल झालेले आहेत. या प्रकरणात भाजपचे आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांचेसुद्धा नाव समोर आले होते. बंब यांचे नाव समोर आल्यानंतर या साखर कारखान्याची राज्यभर चर्चा झाली होती. त्यानंतर आता हाच साखर कारखाना विक्रीला काढण्यात आला आहे. राज्य सहकारी बँकेने वर्तमानपत्रांमध्ये तशी जाहिरात दिली आहे. सभासदांची देणी थकल्यामुळे हा कारखाना विक्रीस काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अचानकपणे कारखाना विक्रीची जाहिरात वर्तमानपत्रांमध्ये झळकल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना धक्का बसला आहे.
आधी कोटींच्या घोटाळ्यामुळे राज्यभर चर्चा, आता देणी थकल्यामुळे गंगापूर साखर कारखाना विक्रीलाhttps://t.co/IEBPShjWSB#sugarmill | #sugarfactory | #aurangabadcitypolice | #PrashantBamb
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 2, 2021
Maharashtra Crime News Case Filed Against Chairman And Directors Of Vasantdada Sugar Factory In Sangli
संबंधित बातम्या :
भाजप आमदारासह 16 जणांवर गुन्हा दाखल, 15 कोटी 75 लाखांचा अपहार केल्याचा आरोप
माफी मागा अन्यथा 23 कोटींचा दावा दाखल करु, प्रशांत बंब यांची चिखलीकरांना नोटीस