नांदेड : गोंदियाच्या (Gondia) महिलेची आठ लाख रुपयांना फसवणूक (Lady Cheated) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नांदेडच्या ग्रामीण पोलिसांनी दोघा जणांना अटक (Nanded Crime News) केली आहे. अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी महिलेकडून आठ लाख रुपये उकळल्याचा आरोप केला जात आहे. नोटांच्या बंडलांप्रमाणे भासणारी कोऱ्या कागदांची थप्पी भामट्यांनी महिलेला दिली होती. फसवणूक झाल्याचे समजताच महिलेने पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दोघा जणांकडून पाच लाख रुपयांची रोकड आणि एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोंदिया जिल्ह्यात राहणाऱ्या महिलेची आठ लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली. गोंदिया इथल्या सेवाभावी संस्थांना तीस लाख रुपयांचे अनुदान मिळवून देतो, असे सांगून आरोपींनी महिलेकडून तब्बल आठ लाख रुपये घेतल्याचं समोर आलं आहे.
अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी महिलेकडून आठ लाख रुपये उकळल्याचा आरोप केला जात आहे. आठ लाख रुपयांच्या बदल्यात आरोपींनी नोटांची बंडल भासतील, अशी कोऱ्या कागदाची बंडल पॅक करत महिलेला दिली होती.
या प्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी उदगीर इथून दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपीकडून पोलिसांनी नगदी पाच लाख रुपये आणि एक दुचाकी जप्त केली आहे.