कुरिअर देण्याच्या बहाण्याने रेकी, बँक अधिकाऱ्याच्या घरी सशस्त्र दरोडा, उच्चशिक्षित चोरटे जेरबंद

हे दोन्ही दरोडेखोर उच्चशिक्षित आहेत. एकाचे पॉलिटेक्निक शिक्षण झालेलं आहे, तर दुसरा इंजिनिअर आहे. दोघेही एका कुरिअर कंपनीमध्ये काम करत होते. ज्या बँक अधिकाऱ्याच्या घरी भर दिवसा दरोडा टाकला त्याच्या घरी ते अनेक वेळा पार्सल आणून देत होते

कुरिअर देण्याच्या बहाण्याने रेकी, बँक अधिकाऱ्याच्या घरी सशस्त्र दरोडा, उच्चशिक्षित चोरटे जेरबंद
हिंगोलीत धाडसी दरोडा
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 7:54 AM

हिंगोली : हिंगोली शहरात उच्चभ्रू वस्तीत पडलेल्या दरोड्याचे (Hingoli Robbery) गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही दरोडेखोर उच्चशिक्षित असून त्यापैकी एक जण इंजिनिअर आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस बँक अधिकाऱ्यांच्या घरात घुसून दोघा जणांनी धाडसी दरोडा टाकला होता. बँक अधिकाऱ्याची पत्नी आणि मुलगा हे घरी एकटे असल्याचं हेरुन भर दिवसा दरोडा टाकण्यात आला होता. मायलेकांचे हातपाय बांधून पत्नीवर चाकू हल्ला करण्यात आला होता. यामध्ये पैशांसह सोन्याच्या दागिन्यांचीही चोरट्यांनी लूट केली होती. पोलिसांनी साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

काय आहे प्रकरण?

हिंगोली शहरातील उच्चभ्रू वस्तीत 30 डिसेंबर रोजी भर दिवसा दरोडा पडला होता. बँक अधिकाऱ्याच्या घरात घुसून त्याच्या मुलांना बांधून टाकून, पत्नीवर चाकू हल्ला करुन चोरट्यांनी पैशांसह सोन्याचे दागिने पळवले होते. या घटनेत पोलिसांनी वेगाने तपास करून दोन आरोपींसह साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचं पोलीस अधीक्षक राकेश कला सागर यांनी सांगितलं.

दोन्ही दरोडेखोर उच्चशिक्षित

हे दोन्ही दरोडेखोर उच्चशिक्षित आहेत. एकाचे पॉलिटेक्निक शिक्षण झालेलं आहे, तर दुसरा इंजिनिअर आहे. दोघेही एका कुरिअर कंपनीमध्ये काम करत होते. ज्या बँक अधिकाऱ्याच्या घरी भर दिवसा दरोडा टाकला त्याच्या घरी ते अनेक वेळा पार्सल आणून देत होते. त्या घराचा अनेक दिवस अभ्यास करुन घरात एकटी महिला आणि मुलगा राहत असल्याची माहिती त्यांनी मिळवली.

संधी साधून त्यांनी भर दिवसा सशस्त्र दरोडा टाकला होता. दोन पिस्तुल, एक जिवंत काडतुस, सोन्याचे दागिने यासह गुन्ह्यात वापरलेले साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. सोन्याचे दागिने मोडून या दरोडेखोरांनी अजून मोठे गुन्हे करण्यासाठी एक पिस्तुल खरेदी केले होते. तेही पिस्तुल पोलिसांनी जप्त केले. ज्या सोनारकडे दागिने मोडले, त्या सोनारावरही गुन्हा दाखल करणार असल्याचं पोलीस अधीक्षक यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

बिल्डरला मागितली तब्बल दोन कोटींची खंडणी, अटक केलेला खंडणीखोर कोण?

वसईत वेटर, सुरक्षा रक्षकाचं काम, वेळ येताच करायचे लूटमार; नेपाळी गँगला बेड्या

फॅशन डिझायनरने विणलं बाईक चोरीचं जाळं, चार दुचाकींची ऑनलाईन विक्री, एका मेसेजमुळे भांडाफोड

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.