केरळातील बँकेवर दरोडा प्रकरण, साताऱ्यातून साडेतीन किलो चांदीसह एक जण केरळ पोलिसांनी घेतला ताब्यात

सोने विक्री करुन मिळालेल्या कमिशनच्या पैशातून खरेदी केलेली साडेतीन किलो चांदी केरळ पोलिसांनी सातारा शहरातील पंचमुखी मंदिरा समोरील एका सोन्याच्या दुकानातून जप्त केली आहे.

केरळातील बँकेवर दरोडा प्रकरण, साताऱ्यातून साडेतीन किलो चांदीसह एक जण केरळ पोलिसांनी घेतला ताब्यात
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Sep 19, 2021 | 5:59 PM

सातारा : केरळ दरोडा प्रकरणी केरळ पोलिसांनी साताऱ्यातील सोन्याच्या दुकानातून साडेतीन किलो चांदी जप्त केली आहे. मागील महिन्यात केरळ येथील बहुचर्चित दरोड्या प्रकरणी सातारा येथील एका हॉटेलमधून निखिल जोशी याला अटक करण्यात आली होती. यामध्ये केरळमधील दरोडा प्रकरणात आणखी धागेदोरे सापडले असल्यामुळे केरळ पोलीस वारंवार साताऱ्याला भेट देत आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मूळ नाशिकचा रहिवासी आहे. पोलिसांनी याप्रकरणी काही दिवसापूर्वी तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र त्या तिघांकडून काहीच माहिती निष्पन्न न झाल्याने केरळ पोलिसांनी त्या तिघांना क्लीन चिट दिली होती.

या दरोड्यातील मुख्य संशयित आरोपी निखिल जोशीसह सध्या साताऱ्यातील राहुल घाडगे या संशयित आरोपीला केरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी अद्याप फरार आहे. सोने विक्री करुन मिळालेल्या पैशातून खरेदी केलेली साडेतीन किलो चांदी केरळ पोलिसांनी सातारा शहरातील पंचमुखी मंदिरा समोरील सोन्याच्या दुकानातून जप्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

काय आहे प्रकरण?

केरळ राज्यातील एका बँकेचे तीन कोटी रुपये किमतीचे साडेसात किलो सोने चोरल्याच्या गुन्ह्यात केरळ आणि सातारा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ऑगस्ट महिन्यात चार जणांना साताऱ्यातून ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतलेल्या संशयितांना केरळ येथे नेण्यात आले होते. यामध्ये मुख्य सूत्रधार निखिल जोशी (रा. नाशिक), आणि इतर तिघांची चौकशी केरळ पोलिसांनी केली होती मात्र मुख्य सूत्रधार सोडून तिघांचा या घटनेत कोणताही सहभाग नसल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्यांना क्लीन चिट दिली होती यातील निखिल जोशीच केरळ चोरीचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती यावेळी समोर आली होती.

कसा लागला होता शोध?

केरळ पोलिसांत एका बँकेचे तीन कोटी रुपये किमतीचे सोने चोरीस नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा केरळ पोलिस महाराष्ट्रात तपासात करत होते. तांत्रिक तपासात नाशिक येथील निक उर्फ निखिल जोशी या युवकाचा या गुन्ह्यात समावेश असून तोच मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले होते. केरळ पोलिसांच्या तपासात निखिल जोशी सातारा परिसरात असल्याची माहिती मिळाली होती.

केरळ पोलिसांचे एक पथक त्या अनुषंगाने सातारा येथे दाखल झाले. त्यांनी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन गुन्ह्याची माहिती दिली आणि संशयित सातारा परिसरात असल्याचे सांगितले. यानुसार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना केरळ पोलिसांना मदत करण्याचा सूचना केल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी केरळ पोलिसांच्या मदतीला देण्यात आले होते यानंतर साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये मुख्य संशयित आरोपी निखिल जोशी केरळ पोलिसांना सापडला होता

संबंधित बातम्या :

Axis बँकेचा मॅनेजर, ICICI बँकेचा माजी मॅनेजर, तरीही दरोडा का टाकला?

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.