कोल्हापुरात 95 वर्षीय वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबातील सहा जणांवर मारहाणीचा आरोप

कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील श्रीमती हिराबाई गणपती नाईक (वय 95 वर्ष) या वृद्धेचा 12 जुलै 2021 रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणी नाईक कुटुंबातील सहा जणांनी संगनमत करुन, कट रचून आजीला मारहाण केल्याचा आरोप आहे.

कोल्हापुरात 95 वर्षीय वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबातील सहा जणांवर मारहाणीचा आरोप
हातकणंगलेतील वृद्धेचा मृत्यू
Follow us
| Updated on: Nov 20, 2021 | 2:21 PM

इचलकरंजी : कोल्हापुरात 95 वर्षीय वृद्धेचा चार महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. या प्रकरणी कुटुंबातील सहा जणांनी संगनमताने कट रचून मारहाण केली. यामध्ये वृद्धेचा मृत्यू झाल्याने संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वृद्धेच्या नातवाकडून करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील श्रीमती हिराबाई गणपती नाईक (वय 95 वर्ष) या वृद्धेचा 12 जुलै 2021 रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणी नाईक कुटुंबातील सहा जणांनी संगनमत करुन, कट रचून आजीला मारहाण केली. यामध्ये तिचा मृत्यू झाल्याने संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी फिर्याद राजू अशोक शिंदे (वय 39 वर्ष, रा. रुकडी) यांनी जिल्हा न्यायालयात केली होती.

यावर सुनावणी होऊन न्यायमूर्ती ऐ. बी. रेडकर यांनी हिराबाई यांचा अनैसर्गिक मृत्यू झाला असून हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरुपाचा असल्याचे मत नोंदवले. हातकणंगले पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करुन तीन महिन्यात पोलीस अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत.

वृद्धेला मारहाण केल्याची पोलिसात तक्रार

हातकणंगले तालुक्यातील रूकडी गावातील श्रीमती हिराबाई नाईक यांचा 12 जुलै 2021 रोजी मृत्यू झाला होता. मृत्यूपूर्वी, 28 नोव्हेंबर 2020 रोजी हिराबाई यांना मुलगा महादेव, नातू दीपक, सुशील, सून अलका, नातसून लक्ष्मी यांनी मारहाण केल्याची तक्रार हातकणंगले पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. त्यानुसार त्यांच्यावर 439/2020 नुसार मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

मृत्यूवेळी वृद्धेच्या मान-डोक्यावर जखमेचे व्रण

11 जानेवारी 2021 रोजी हिराबाई यांचा मुलगा महादेव नाईक याने आईचा सांभाळ करण्याबाबत उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. प्रांतांच्या आदेशानंतर त्या 16 एप्रिल 2021 रोजी मुलाकडे राहण्यास गेल्या. दरम्यान 12 जुलै 2021 रोजी हिराबाई यांचा मृत्यू झाला. यावेळी त्यांच्या मान, डोक्यावर जखमेचे व्रण होते. तसेच त्यांच्या नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. तो बंद करण्यासाठी कापसाचे बोळे नाकात घातले होते. जसजसे ते रक्ताने भिजतील तसतसे ते बदललेले होते.

नातवाची कोर्टात धाव

ही सर्व घटना आरोपींच्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड आहे. या घटनेबाबत उलगडा झाल्यास हिराबाई यांच्या मृत्यूचे कारण समोर येईल. यासाठी फिर्यादी राजू अशोक शिंदे यांनी 26 जुलै 2021 रोजी हातकणंगले पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. परंतु पोलिसांनी अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे शिंदे यांनी 156 (3) अन्वये न्यायालयात दाद मागितली.

न्यायाधीश काय म्हणाले

यावेळी न्यायाधीशांनी सांगितले, की हिराबाई यांचे निधन अनैसर्गिक पद्धतीने झाले आहे, असे दिसून येते. आरोपी आणि मयत यांच्यात फौजदारी खटले देखील प्रलंबित होते. आरोपी यांनी मयत महिलेला गंभीर दुखापत केल्याबाबत केस देखील प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत फिर्यादी करत असलेली मागणीही न्यायोचित आहे. महिलेच्या निधनाचे कारण समोर येणे देखील आवश्यक आहे. आरोपींच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजवरून देखील घटना कशी घडली, हे कळून येईल, असे सांगत हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरुपाचा असल्याचे मत न्यायाधीशांनी नोंदवले आहे.

तीन महिन्यांच्या आत याबाबतचा तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत. नातवाने आपल्या आजीला मृत्यूनंतर न्याय मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने अर्ज भरून पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हातकणंगले पोलिसांवरही न्यायालयाने चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

एखादी गंभीर बाब असताना सुद्धा पोलिसांनी याचा तपास गांभीर्याने का घेतला नाही, असा सवालही न्यायालयाने केला आह. अशाप्रकारे पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एखाद्या मृत व्यक्तीला न्याय मिळवून दिला आहे. आरोपींवर कलम 302 चा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये खळबळ माजली आहे. असा निकाल पहिल्यांदाच जिल्ह्यामध्ये झाला असेल.

संबंधित बातम्या :

24 वर्षीय पुतण्या नवविवाहित काकीच्या प्रेमात, दोघं घरातून रफूचक्कर, काका म्हणतो मी तिला एकदाच…

बायकोचा दुसऱ्या नवऱ्यासोबत घरोबा, पहिला पती पोलिसात, म्हणतो ‘तिला नांदायला आणा म्हणजे आणाच…’

पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, धारदार चाकूने 30 वेळा वार करुन हत्या

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.