मंजूर कर्जाची रक्कम देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ, कोल्हापुरात तरुणाची आत्महत्या

| Updated on: Sep 15, 2021 | 4:00 PM

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मंजूर कर्जाची रक्कम देण्यास अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने तरुणाने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. 20 ऑगस्टला जयने विष प्राशन केले होते, तर 23 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला

मंजूर कर्जाची रक्कम देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ, कोल्हापुरात तरुणाची आत्महत्या
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मंजूर कर्जाची रक्कम देण्यास अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने कोल्हापुरातील तरुणाने आयुष्य संपवलं. तरुणाच्या आत्महत्ये प्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांसह बँक निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

कर्ज मंजूर होऊनही रक्कम मिळत नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मंजूर कर्जाची रक्कम देण्यास अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने तरुणाने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.

विष प्यायल्यानंतर तीन दिवसांनी मृत्यू

जय डवंग असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. 20 ऑगस्टला जयने विष प्राशन केले होते, तर 23 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. आत्महत्या प्रकरणी बँक निरीक्षक राजेंद्र बेलेकर आणि शाखा अधिकारी नामदेव खोत यांच्यावर कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठा आरक्षण नसल्याने जालन्यात तरुणाचा गळफास

दुसरीकडे, मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षण नसल्यानं एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील येणोरा गावात घडलीये.

सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या

सदाशिव शिवाजी भुंबर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो 22 वर्षांचा होता. ‘आरक्षण नसल्याने जीवनयात्रा संपवतोय’, अशी सुसाईड नोट लिहून त्याने आपल्या आयुष्याचा शेवट केला.

सदाशिव हा एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. त्याने इलेक्ट्रीशियनचा कोर्स केला होता. मात्र मराठा आरक्षण नसल्यानं पाहिजे तशी नोकरी मिळत नव्हती, असा त्याचा आरोप होता. शिवाय शेतात ओला दुष्काळही आहे आणि याच विंवचनेत सदाशिवनं घरातील छताच्या पंख्याला मंगळवारी रात्री गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

येणोरा गावातील तरुणांची मागणी

आत्महत्या करण्यापूर्वी सदाशिवनं एक सुसाईड नोटही लिहून ठेवली. यामध्ये त्याने ओला दुष्काळ आणि मराठा आरक्षण नसल्याने आत्महत्या करीत आहे, असं स्पष्ट उल्लेख केला आहे. आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आपले प्राण दिले आहेत. महिना-दोन महिन्यांनी अशी बातमी राज्यातून येताना दिसतात. त्यापेक्षा एकदाच आरक्षणाचा निकाल लावून टाका, अशी मागणी येणोरा गावातील मराठा तरुणांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

‘आरक्षण नाही, जीवनयात्रा संपवतोय’, मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या

सावकारांच्या जाचाला कंटाळून दोघांची आत्महत्या, हातावर आरोपींच्या नावांचा उल्लेख, परभणीत खळबळ

हॉटेलमध्ये नवरा-बायको म्हणून मुक्काम, बॉयफ्रेण्डकडून चारित्र्यावर संशय, अल्पवयीन मुलीची आत्महत्या