VIDEO | गँगस्टर छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रुट ईडीच्या ताब्यात, छापेमारीदरम्यान कारवाई

ईडीने अंडरवर्ल्ड डाऊन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचे घर आणि इतर मालमत्तांवर छापे टाकले आहेत. एका राजकीय नेत्याशी संबंधित ठिकाणांवरही ही धाड सुरु असल्याचं बोललं जात आहे.

VIDEO | गँगस्टर छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रुट ईडीच्या ताब्यात, छापेमारीदरम्यान कारवाई
छोटा शकील (डावीकडे)
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 1:37 PM

मुंबई : गँगस्टर छोटा शकीलच्या (Chhota Shakeel) नातेवाईकाला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी ताब्यात घेतले. मुंबईत सुरु असलेल्या छापेमारीदरम्यान (Enforcement Directorate searches) सलीम फ्रुटवर (Saleem Fruit) ईडीने कारवाई केली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचे घर आणि संबंधित मालमत्तांच्या व्यवहारांशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांच्या चौकशीचा भाग म्हणून ही छापेमारी सुरु असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. ईडीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हसीना पारकरच्या घरावर असलेलं सील तोडl सर्च ऑपरेशन केलं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईवर शिवसेना आज दुपारी पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं होतं. केंद्रीय तपास यंत्रणांनीही ही प्रेस कॉन्फरन्स ऐकावी, असं आवाहन राऊतांनी केलं होतं. या पार्श्वभूमीवर या छाप्यांना विशेष महत्त्व आहे. मुंबईतील सुमारे दहा ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलमां अंतर्गत ही कारवाई केली जात आहे.

ईडीने अंडरवर्ल्ड डाऊन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचे घर आणि इतर मालमत्तांवर छापे टाकले आहेत. एका राजकीय नेत्याशी संबंधित ठिकाणांवरही ही धाड सुरु असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) नुकत्याच दाखल केलेल्या एफआयआर आणि गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ईडीची कारवाई सुरु असल्याचंही सांगितलं जात आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

जी काही दादागिरी चालली आहे त्याला आम्ही उत्तर देऊ. केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून शिवसेना, ठाकरे परिवारावर जो काही आरोपांचा चिखल उडवला जातोय त्याला आम्ही उत्तर देऊ. हा जेलमध्ये जाईल तो जेलमध्ये जाईल. देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत असेल असं काही सांगितलं जात आहे. पण आता देशमुख कोठडीबाहेर असतील आणि भाजपचे साडेतीन लोकं अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील. आय रिपीट, भाजपचे साडेतीन लोकं लवकरच तुरुंगात असतील, असं संजय राऊत सोमवारी पत्रकार परिषद घेऊन म्हणाले.

हमाम में सब नंगे होते है

महाराष्ट्रातही सरकार आहे. हे लक्षात घ्या. ते शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार आहे. सरकार हे सरकार असतं. त्यामुळे ज्यांना आत टाकायचे आहे, त्याचा बंदोबस्त सुरू आहे. हमाम में सब नंगे होते है. एक मर्यादा असते राजकारणात. तुम्ही ती ओलांडली आहे. सर्वांना माहीत आहे मी काय बोलतोय आणि कुणाबद्दल बोलत आहे. माझ्या बोलण्यामुळे त्यांची झोप उडाली आहे. आम्हाला धमक्या देऊ नका. आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही. मी तर नाहीच नाही. एजन्सी आणि सरकारला जे उखडायचे ते उखडा, असा इशाराच त्यांनी दिला.

संबंधित बातम्या:

दाऊदच्या बहिणीच्या घरी ED चे छापे, राऊतांच्या स्फोटक पत्रकार परिषदेआधी ईडीचे धाडसत्र?

भाजपचे ‘साडेतीन’ कोण? ED-CBI लाही उत्तर ऐकण्याचं राऊतांचं आवाहन, शिवसेनेच्या पत्रकार परिषदेची वेळ काय?

भाजपचे साडेतीन लोक तुरुंगात जातील, आय रिपीट, जे उखडायचे ते उखडा; संजय राऊतांचा मोठा दावा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.