नागपुरात गाजलेल्या निमगडे खून प्रकरणात 5 वर्षांनी मोठा खुलासा; कुख्यात गुंडांचा सहभाग उघड
तब्बल पाच वर्षानंतर नागपूरच्या बहुचर्चित एकनाथ निमगडे हत्या प्रकरणात (Eknath Nimgade Murder Case) पोलिसांनी मोठा खुलासा केलाय.

नागपूर : तब्बल पाच वर्षानंतर नागपूरच्या बहुचर्चित एकनाथ निमगडे हत्या प्रकरणात (Eknath Nimgade Murder Case) पोलिसांनी मोठा खुलासा केलाय. निमगडे खून प्रकरणात नागपूरचा कुख्यात गुंड रणजीत सफेलकर आणि त्याचा खास सहकारी कालू हाटेचा सहभाग असल्याचा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी खुलासा केला. या प्रकरणात हजारो गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली असून 9 आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत तर 5 जण फरार आहेत (Maharashtra Crime News Nagpur Guns Ranjit Safelekar Had Part In Eknath Nimgade Murder Case).
नागपुरात 2016 मध्ये आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांड घडलं. या हत्याकांडाची मोठी चर्चा झाली. त्यानंतर या खुनाच्या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असल्याने नागपूर पोलिसांनी सर्व माहिती सीबीआयच्या पथकाला दिली आहे.
व्यवसायाने आर्किटेक्ट असलेल्या एकनाथ निंगाडे यांची 6 सप्टेंबर 2016 रोजी भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कोट्यावधी रुपयांच्या जमिनीच्या वादातून काही अज्ञात लोकांनी एकनाथ निमगडे यांचा खून केला होता. खुनाची सुपारी रणजीत सपेलकरने दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
या प्रकरणाचा तपास करत असताना अनेक गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली आणि एकेक कडी जोडण्यात आली. सीबीआयने या प्रकरणात मदत करणाऱ्याला 5 लाख रुपयांचं बक्षिस सुद्धा जाहीर केलं होतं. पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा करत सीबीआयला याची संपूर्ण महिती दिली. मात्र, मुख्य सूत्रधार रणजीत सफेलकर अजूनही फरार आहेत.
सीबीआय आता या प्रकरणात पुढे काय करते याकडे आता सगळ्या नागपूरचं लक्ष लागलं आहे.
नवी मुंबई पोलिसांचं कौशल्य, दोन अक्षराच्या पत्यावरुन अडीच वर्षांपासून फरार आरोपीला बेड्याhttps://t.co/yB79AMSd3c@Navimumpolice #Crime #crimenews
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 18, 2021
Maharashtra Crime News Nagpur Guns Ranjit Safelekar Had Part In Eknath Nimgade Murder Case
संबंधित बातम्या :
मुंबईत भाजी विकण्याच्या बहाण्याने गांजा विक्रीचा व्यवसाय; उच्चशिक्षीत तरुणाला अटक
गळ्यात स्टीलचे पट्टे बांधून गुलाम बनवले, तरुणाने घरात 6 सेक्स स्लेव ठेवले, पोलिसांकडून सुटका