नागपूर कारागृहात गुंडाचा जेलरवर हल्ला, तुरुंगातील कर्मचाऱ्यांकडून कैद्याची धुलाई

गुंड शोयब मलिक खान सात वर्षांपूर्वी नागपूरातील कारागृहातून पळून गेला होता. जेलरवर हल्ला झाल्याने तुरुंग प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे तो जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता का, असा सवाल उपस्थित झाला आहे. 

नागपूर कारागृहात गुंडाचा जेलरवर हल्ला, तुरुंगातील कर्मचाऱ्यांकडून कैद्याची धुलाई
नागपूर मध्यवर्ती जेल
Image Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Feb 23, 2022 | 8:49 AM

नागपूर : नागपूर कारागृहातील जेलब्रेकमधील गुंडाने जेलरवर (Nagpur Crime) हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुंड शोयब मलिक खान याने जेलर हेमंत इंगोले यांच्यावर हल्ला केला. कारागृहातील कर्मचाऱ्यांनी शोयबला आवरुन त्याची धुलाई केली. गुंड शोयब मलिक खान सात वर्षांपूर्वी नागपूरातील कारागृहातून (Nagpur Jail) पळून गेला होता. जेलरवर हल्ला (Jailer Attack) झाल्याने तुरुंग प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. गुंड जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

काय आहे प्रकरण?

कैद्यांमधील टोळीयुद्ध आपल्यासाठी नवीन नाही. मात्र नागपूर मध्यवर्ती कारागृहातील जेलब्रेकमधील गुंडाने जेलरवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुंड शोयब मलिक खान याने जेलर हेमंत इंगोले यांच्यावर हल्ला केला.

कैद्याची धुलाई

कारागृहातील कर्मचाऱ्यांनी शोयबला आवरुन त्याची धुलाई केली. यामध्ये तुरुंगाधिकारी हेमंत इंगोले जखमी झाल्याची माहिती आहे. जेलरवर हल्ला झाल्याने तुरुंग प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

जेलमधून पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न?

गुंड शोयब मलिक खान सात वर्षांपूर्वी नागपूरातील कारागृहातून पळून गेला होता. त्यामुळे तो जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

संबंधित बातम्या :

नाशिकमध्ये RTI कार्यकर्त्यावर गोळीबार, भररस्त्यात थरार, प्रशांत जाधव जखमी

CCTV | कार पार्किंगवरुन बाचाबाची, मुरबाडमध्ये डॉक्टरवर कोयत्याने हल्ला

दहा रुपयांच्या सिगारेटवरुन वाद, टोळक्याचा दुकानावर हल्ला, दुकानदाराच्या वडिलांची हत्या