Nanded Rape | चॉकलेटच्या आमिषाने पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, 60 वर्षांच्या नराधमाला बेड्या

चॉकलेटचे आमिष दाखवून पाच वर्षांच्या बालिकेवर शारीरिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली आहे.

Nanded Rape | चॉकलेटच्या आमिषाने पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, 60 वर्षांच्या नराधमाला बेड्या
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 2:10 PM

नांदेड : पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार (Assault) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चॉकलेटचे आमिष दाखवून बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. नांदेड जिल्ह्यात (Nanded Crime) हा प्रकार समोर आला आहे. 60 वर्षांच्या नराधमाने चिमुरडीवर अत्याचार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. लोह्याजवळ काल ही घटना घडली. नरबा कांबळे असं अत्याचार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. पीडितेला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गावकऱ्यांनी या नराधमास चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी सोनखेड पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

चॉकलेटचे आमिष दाखवून पाच वर्षांच्या बालिकेवर शारीरिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली आहे.

नेमकं काय घडलं?

चिमुकलीचे आई-वडील शेताकडे गेल्याची संधी साधत गावातीलच नरबा कांबळेने चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून घरी नेले आणि अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. पीडित मुलीने आईला याबाबत सांगितले, त्यावेळी त्यांना धक्काच बसला.

गावकऱ्यांकडून चोप

यातील साठ वर्षीय नराधम आरोपी नरबा कांबळेला पोलिसांनी अटक केली आहे. अत्याचार झाल्यानंतर मुलीला रक्तस्त्राव सुरू झाल्याने ही घटना उघडकीस आली. ही घटना उघडकीस आल्याने गावकऱ्यांनी आरोपीला चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केलं.

पीडितेवर रुग्णालयात उपचार

पीडित बालिकेच्या आईच्या तक्रारीवरून सोनखेड पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. पीडितेला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

आर्मी ऑफिसर असल्याचा बनाव, 50 हून अधिक तरुणींशी संबंध, बलात्कारानंतर निर्घृण हत्या

पतीला सेल्फी पाठवण्याची धमकी देत बलात्कार; सोशल मीडियातली मैत्री पडली महागात

गतिमंद चिमुकलीवर अत्याचार, सांकेतिक भाषेद्वारे साक्ष, न्यायमंदिरात अखेर नराधमाचा निकाल लागलाच

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....