Nanded Crime | बियाणींच्या हत्येनंतरही नांदेडमध्ये गुंडाराज कायम, सराईत गुन्हेगाराचा पोलीस पथकावर तलवार हल्ला

मंगळवारी नांदेडमध्ये सुप्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी घटनेनंतर नाकाबंदी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच ज्यांच्यावर देशी कट्टयांचे गुन्हे आहेत, त्यांची झाडाझडती सुरु आहे.

Nanded Crime | बियाणींच्या हत्येनंतरही नांदेडमध्ये गुंडाराज कायम, सराईत गुन्हेगाराचा पोलीस पथकावर तलवार हल्ला
गुन्हेगाराचा पोलिसांवर हल्लाImage Credit source: Nanded Attack
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 9:51 AM

नांदेड : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani Murder Case) यांची गोळ्या घालून हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच नांदेडमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी रात्री नांदेड ग्रामीण हद्दीत (Nanded Crime) आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर आरोपीने तलवारीने हल्ला (Sword Attack) केला. त्यामुळे बचावासाठी पोलिसांनी आरोपीच्या मांडीवर गोळी झाडली. त्यानंतर उपचारासाठी त्याला रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेमुळे पुन्हा एकदा नांदेड हादरले आहे.

काय आहे प्रकरण?

मंगळवारी नांदेडमध्ये सुप्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी घटनेनंतर नाकाबंदी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच ज्यांच्यावर देशी कट्टयांचे गुन्हे आहेत, त्यांची झाडाझडती सुरु आहे.

त्यातच नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड हे पथकासह वसरणी भागात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी गुन्हेगार संजूसिंह बावरी हा साईबाबा मंदिर परिसरात असल्याची माहिती मिळाली.

सराईत गुन्हेगाराचा तलवार हल्ला

त्यानंतर पथक त्याच्याकडे गेले असता, त्याने माझ्याकडे कशाला आलात, असे म्हणून शिवा पाटील या कर्मचाऱ्यावर तलवारीने हल्ला केला. यात पाटील हे जखमी झाले.

आरोपीच्या मांडीवर पोलिसांनी झाडली गोळी

इतरही कर्मचाऱ्यांच्या अंगावर तो तलवार घेऊन धावत होता. यावेळी पोलीस निरीक्षक घोरबांड यांनी त्याच्या मांडीवर गोळी घालून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर आरोपी बावरी आणि कर्मचारी पाटील या दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

बिल्डर Sanjay Biyani हत्याकांड, खा. प्रतापराव चिखलीकरांची गृहमंत्री अमित शहांशी भेट, 3 दिवसात तपास कुठवर?

संजय बियाणी हत्याकांडांची गृहमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; विशेष चौकशी पथकाच्या तपासाचा नियमित आढावा घेणार

 नांदेडमधील संजय बियाणी हत्या प्रकरण, आरोपींच्या अटकेसाठी माहेश्वरी समाजाचा मूक मोर्चा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.