Nanded Rape | अल्पवयीन मुलीवर डॉक्टरचा वारंवार बलात्कार, पीडिता चार महिन्यांची गर्भवती

पीडितेच्या असहाय्यतेचा फायदा घेत, तिला वेगवेगळी आमिषं दाखवून डॉक्टरने अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. यातून ती चार महिन्यांची गर्भवती राहिली.

Nanded Rape | अल्पवयीन मुलीवर डॉक्टरचा वारंवार बलात्कार, पीडिता चार महिन्यांची गर्भवती
धक्कादायक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 12:34 PM

नांदेड : अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने (Doctor) सातत्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात (Nanded Crime News) हा प्रकार घडला. चौदा वर्षांच्या मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत नराधम डॉक्टरने तिच्यावर वारंवार बलात्कार (Rape) केल्याचा आरोप आहे. पीडितेचा गर्भपात झाल्याने ही घटना काल उघडकीस आली.

काय आहे प्रकरण?

डॉक्टर विकास सुंकरवार असं नराधम डॉक्टरचं नाव आहे. अल्पवयीन असलेली पीडित मुलगी ही वर्षभरापासून किनवट येथील डॉ. विकास सुंकरवार यांच्याकडे साफसफाईच्या कामाला होती.

चार महिन्यांची गर्भवती

पीडितेच्या असहाय्यतेचा फायदा घेत, तिला वेगवेगळी आमिषं दाखवून डॉक्टरने अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. यातून ती चार महिन्यांची गर्भवती राहिली. पोट दुखत असल्याने तिला एका दवाखान्यात नेले असता बाथरुममध्येच तिचा गर्भपात झाल्याने बलात्काराची संपूर्ण घटना उघडकीस आली.

हे सुद्धा वाचा

पीडितेचा इन कॅमेरा जबाब नोंदवून डॉ. सुंकरवार विरोधात किनवट पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

सुंकरवार याला न्यायालयाने 12 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. डॉक्टर सुंकरवारच्या या कुकर्मामुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.