नांदेडमध्ये बापलेकाची हत्या, वडिलांचा मृतदेह पोलिसांनी उकरुन काढला, अल्पवयीन मुलगा बेपत्ता

नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी इथे पिता-पुत्राची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मयत दोघेही परप्रांतीय मजूर असल्याची माहिती आहे. मजुरांच्या दोन गटांमध्ये आपसात झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचा आरोप आहे.

नांदेडमध्ये बापलेकाची हत्या, वडिलांचा मृतदेह पोलिसांनी उकरुन काढला, अल्पवयीन मुलगा बेपत्ता
नांदेडमध्ये पितापुत्राची हत्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 7:46 AM

नांदेड : पितापुत्राची हत्या (Father Son Murder) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मजुरांच्या दोन गटांमध्ये आपसात झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचा आरोप आहे. नांदेड जिल्ह्यातील (Nanded Crime) कुंडलवाडी इथे हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. परप्रांतीय पितापुत्र मजुरांची हत्या (Labor Murder) करण्यात आलीय. वडिलांचा पुरलेला मृतदेह पोलिसांनी उकरुन काढला, तर मयत अल्पवयीन मुलाचा शोध अद्याप लागलेला नाही. रशीद खान असं 45 वर्षीय पित्याचं नाव आहे. तर त्यांचा मुलगा 17 वर्षांचा होता. राजस्थानहून पिकांची काढणी करण्यासाठी आलेल्या या मजुरांच्या गटात आपापसात वाद झाला होता. या भांडणातूनच ही हत्या झाल्याचा आरोप केला जात आहे. मयत रशीद खान यांच्या पत्नीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हत्या प्रकरणी पाच आरोपीना अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी इथे पिता-पुत्राची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मयत दोघेही परप्रांतीय मजूर असल्याची माहिती आहे. मजुरांच्या दोन गटांमध्ये आपसात झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचा आरोप आहे.

वडिलांचा पुरलेला मृतदेह उकरला

वडिलांचा पुरलेला मृतदेह पोलिसांनी उकरुन बाहेर काढला, तर अल्पवयीन मुलाचा शोध अद्याप लागलेला नाही. 45 वर्षीय पित्याचं नाव रशीद खान असून तर त्यांचा मुलगा 17 वर्षांचा होता.

रशीद खान यांच्या पत्नीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पिकांची काढणी करण्यासाठी राजस्थानहून आलेल्या या मजुरांच्या गटात आपापसात वाद झाला होता. या भांडणातूनच ही हत्या झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पाच जणांना बेड्या

हत्या प्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अतिरीक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे हे स्वतः या दुहेरी हत्याकांडाचा तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

मध्यरात्री भररस्त्यात हल्ला, 40 वर्षीय व्यक्तीच्या खुनाने परभणीत खळबळ

बहिणीला त्रास देणाऱ्या भाऊजींची हत्या, लातूरमध्ये दोघा मेव्हण्यांना बेड्या

पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडले, पतीचं टोकाचं पाऊल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.