Nanded Murder | खिचडी खाल्ल्यावरुन वाद, बाप-लेकाची तरुणाला बेदम मारहाण, नांदेडमध्ये तरुणाचा मृत्यू
खिचडीचे पार्सल घेण्यासाठी योगेश गिरी हा शिवलिंगच्या घरी आला . पण ही खिचडी खाल्ल्याच्या कारणावरून त्यांच्यात मोठा वाद सुरू झाला. यावेळी शिवलिंग गायंकी आणि त्याचा मुलगा प्रियदर्शन गायंकी या दोघांनी योगेश गिरी यास लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली
नांदेड : नांदेड शहरातील (Nanded Crime) शासकीय दूध डेअरी परिसरातील विणकर कॉलनीमध्ये एका युवकाची लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली. खिचडी खाल्ल्याच्या क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादानंतर पिता-पुत्राने त्याचा निर्घृण खून (Murder) केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी आरोपी बाप लेकाला अटक केली आहे. गुरुवार (31 मार्च) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी मयत योगेश गिरीची आई शोभाबाई विलास गिरी यांच्या फिर्यादीवरून 30 मार्च रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात शिवलिंग गायंकी आणि प्रियदर्शन गायंकीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
नांदेड तालुक्यातील धनेगावजवळ असलेल्या शासकीय दूध डेअरी चौकातील विणकर कॉलनी भागात राहणारा योगेश विलास गिरी (वय 26 ) आणि शिवलिंग व्यंकटराव गायंकी (वय 45 ) हे दोघे जण देगाव, येळेगाव कारखाना ता . अर्धापूर येथे कामासाठी गेले होते. दोघे जण भोकरफाटा मार्गे घरी आले. येताना योगेश गिरी याने भोकरफाटा येथून खिचडी पार्सल घेतली , पण खिचडीचे हे पार्सल ते शिवलिंग गायकी याच्या घरी विसरले.
खिचडी खाल्ल्यावरुन वादावादी
दरम्यान शिवलिंगच्या घरच्याने ही खिचडी खाल्ली. थोड्या वेळाने खिचडीचे पार्सल घेण्यासाठी योगेश गिरी हा शिवलिंगच्या घरी आला . पण ही खिचडी खाल्ल्याच्या कारणावरून त्यांच्यात मोठा वाद सुरू झाला. यावेळी शिवलिंग गायंकी आणि त्याचा मुलगा प्रियदर्शन गायंकी या दोघांनी योगेश गिरी यास लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली, यात योगेश गिरीचा मृत्यू झाला .
या प्रकरणी मयत योगेश गिरीची आई शोभाबाई विलास गिरी यांच्या फिर्यादीवरून 30 मार्च रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात शिवलिंग गायंकी आणि प्रियदर्शन गायंकीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन्ही आरोपींना रात्री अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक माणिक हंबर्डे करत आहेत.
संबंधित बातम्या :
आधी हत्या, मग कोरड्या विहिरीत मृतदेह फेकला! अखेर मारेकऱ्यांना पोलिसांनी गाठलंच
आजेसासू, बायकोसह दोन लेकरांची हत्या, गुजरातच्या मराठी कुटुंबातील हत्येचं गूढ उकललं
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून, प्रियकराकडून निर्घृण खून, औरंगाबादच्या शफेपूरची घटना