मित्र म्हणाला माझ्याकडे पैसे नाहीत, काकाला येऊ दे, चिडलेल्या तरुणाने जीवलगालाच संपवलं

पैशांच्या वादातून तरुणाने मित्राचीच हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नात्याने जवळ असलेल्या या दोन्ही तरुणांत गाढ मैत्री देखील होती. याच दरम्यान दोघात काही पैशांच्या देवाणघेवाणी वरुन वाद झाला होता.

मित्र म्हणाला माझ्याकडे पैसे नाहीत, काकाला येऊ दे, चिडलेल्या तरुणाने जीवलगालाच संपवलं
मयत शहाजी जाधव
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 11:30 AM

नांदेड : पैशांच्या वादातून तरुणाने मित्राचीच हत्या (Friend Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणाने चाकूने भोसकून मित्राचा जीव घेतल्याचा आरोप केला जात आहे. ही घटना नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडज गावात घडली आहे. मित्राने चाकूने भोसकलेला शहाजी जाधव हा पंचवीस वर्षीय युवक गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. या घटनेने मुखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पैशांच्या देवाणघेवाणीवरुन झालेल्या वादातून मित्राने टोकाचं पाऊल उचलल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या घटनेत प्राण गमावलेला शहाजी जाधव आणि आरोपी ज्ञानेश्वर जाधव हे दोघेही भावकीतलेच तरुण आहेत.

काय आहे प्रकरण?

पैशांच्या वादातून तरुणाने मित्राचीच हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नात्याने जवळ असलेल्या या दोन्ही तरुणांत गाढ मैत्री देखील होती. याच दरम्यान दोघात काही पैशांच्या देवाणघेवाणी वरुन वाद झाला होता.

पैशांच्या मागणीवरुन वाद

आरोपी ज्ञानेश्वरने शहाजीकडे काल पैशांची मागणी केली होती, मात्र माझ्याकडे पैसे नाहीत, काकाला येऊ दे, देतो, असे शहाजीने ज्ञानेश्वरला सांगितले. मात्र या उत्तरामुळे ज्ञानेश्वरचा पारा चढला आणि त्याने जवळच्या धारदार शस्त्राने शहाजीच्या पोटात, छातीवर वार केले.

गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

या चाकूच्या हल्ल्यात शहाजी हा रक्तबंबाळ झाला होता. गंभीर अवस्थेत जखमी असलेल्या शहाजीवर सुरुवातीला मुखेडमध्ये प्राथमिक उपचार करून त्याला नांदेडला हलवण्यात आले. मात्र नांदेडला सरकारी रुग्णालयात आणताच डॉक्टरांनी शहाजीला मयत घोषित केलं आहे.

तरुणावर हत्येचा गुन्हा

या प्रकरणी मयत शहाजीच्या वडिलांच्या तक्रारीवरून मुखेड पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर जाधव वर हत्येचा गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी रात्री उशिरा आरोपी ज्ञानेश्वर जाधव याला गावातून अटक करण्यात आलंय.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विलास गोबाडे करत आहेत. किरकोळ पैशांच्या क्षुल्लक वादातून मित्रानेच मित्राला संपवल्याच्या या घटनेने मुखेड तालुक्यात एकच खळबळ उडालीय. काही क्षणांच्या रागामुळे होत्याच नव्हत झालं अशी चर्चा या घटनेनंतर रंगली आहे.

संबंधित बातम्या :

यवतमाळमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या, व्यावसायिक वादातून हत्या झाल्याचा संशय

Dr Suvarna Waje मृत्यूप्रकरणी खुलासा, पती संदीप वाजेनेच केली हत्या

अवघ्या 150 रुपयांवरुन वाद, जिगरी दोस्ताची निर्घृण हत्या, वडिलांसमोर विदारक दृश्य

एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.