हरयाणात अटक चार दहशतवादी नांदेडच्या रिंदाचे साथीदार, सुरक्षा यंत्रणांकडून झाडाझडती

गेल्या वर्षी लुधियाना इथे हँड ग्रेनेडचा स्फोटात रिंदाच्या साथीदाराचा सहभाग असल्याचे उघड झाले होते, तेव्हापासून रिंदा सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर आहे. आता त्याचे 4 साथीदार शस्त्र आणि स्फोटके नांदेडला पाठवताना हरियाणात अटक झाले आहेत

हरयाणात अटक चार दहशतवादी नांदेडच्या रिंदाचे साथीदार, सुरक्षा यंत्रणांकडून झाडाझडती
रिंदा समर्थकांच्या घरी नांदेड पोलिसांची झाडाझडतीImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 10:38 AM

नांदेड : हरयाणातील कर्नाल (Karnal Haryana) इथे नांदेडला येणाऱ्या चार दहशतवाद्यांना (Terrorist Arrest) अटक केल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा नांदेड पोलिसांच्या (Nanded Police) संपर्कात आहेत. अटक केलेले चार जण हे कुख्यात दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदाचे साथीदार आहेत. रिंदा हा मूळचा नांदेडचा असल्याने देशभरातील सुरक्षा यंत्रणा रिंधाची माहिती गोळा करतायत.

काय आहे प्रकरण?

गेल्या वर्षी लुधियाना इथे हँड ग्रेनेडचा स्फोटात रिंदाच्या साथीदाराचा सहभाग असल्याचे उघड झाले होते, तेव्हापासून रिंदा सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर आहे. आता त्याचे 4 साथीदार शस्त्र आणि स्फोटके नांदेडला पाठवताना हरियाणात अटक झाले आहेत. त्यामुळे हरयाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि पंजाब राज्यातील सुरक्षा यंत्रणा नांदेड पोलिसांच्या संपर्कात आहेत.

रिंदाचे 33 साथीदार जामिनावर

रिंदा बाबत ह्या सुरक्षा यंत्रणा माहितीचे आदान प्रदान करत आहेत. दरम्यान , नांदेडमध्ये रिंदाचे जवळपास पन्नास साथीदार असून त्यातील 33 जण हे जामिनावर आहेत, त्यांची झाडाझडती पोलीस घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

कर्नाल इथे अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून काही धक्कादायक माहिती मिळतेय, अशी चर्चा आहे. मात्र याबाबतीत अधिकृतपणे काहीही सामोरे येत नाही. नांदेड पोलिसांना देखील याबाबतीत काहीही माहिती नाही, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने स्पष्ट केलंय.

मुंबईत मालिका बॉम्बस्फोट होण्याची भीती

5-6 महिन्यांपूर्वी मुंबईत मालिका बॉम्बस्फोट होण्याची भीती व्यक्त केली जात होती. ही भीती हरविंदर सिंग रिंडा याच्याशी संबंधित असल्याचेही सांगितले जात आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.