नाशिक : नाशिकमध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्यावर गोळीबार (RTI Worker Firing) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात प्रशांत जाधव (Prashant Jadhav) जखमी झाले आहेत. नाशिक शहरातील सिडको भागात (Nashik Crime) असलेल्या उपनगर परिसरात सोमवारी रात्री ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात जाधव यांच्या मांडीला एक गोळी लागली तर दुसरी गोळी पोटाला चाटून गेली. जखमी प्रशांत जाधव यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
सामाजिक कार्यांमध्ये अग्रेसर असलेले आणि एका पक्षाचे पदाधिकारी असलेले प्रशांत जाधव यांच्यावर नाशिकमधील एका मेडिकल स्टोअरजवळ अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याचं समोर आलं आहे. या हल्ल्यात जाधव जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोळीबारात जाधव यांच्या मांडीला एक गोळी लागली तर दुसरी गोळी पोटाला चाटून गेली. हा गोळीबार नेमका कोणी आणि का केला? याचा तपास पोलीस करत आहेत. परिसरातील सीसी टीव्ही फुटेजची मदत घेतली जात आहे. घटनास्थळी पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. गोळीबार झाल्याच्या घटनेमुळे सिडको परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
संबंधित बातम्या :
रिक्षा चालकाची गोळ्या झाडून हत्या, मुंबईतील धारावीत थरार, महिलेवर संशय
CCTV | जुन्या भांडणातून तरुणावर गोळीबार, गोळी चुकवल्याने तरुण बचावला, पुण्यातील बिबवेवाडीत थरार
VIDEO | भर चौकात गोळीबार, पुण्यात तरुणाची हत्या, जुन्या वादातून काटा काढला?