Virar | डिग्रीविना वसई विरार मनपाच्या वैद्यकीय अधिकारीपदी, नामवंत डॉ. सुनील वाडकर यांना अटक
वाडकर यांच्या रुग्णालयात छापा मारला असता त्यांच्याकडे अधिकृत वैद्यकीय प्रमाण पत्र, वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असणारे कागदपत्र मिळाले नाहीत, त्यांना मागितले तर त्यांनी समाधानकारक उत्तर दिली नाहीत.
वसई : वसई विरार महापालिकेचे माजी वैद्यकीय अधिकारी आणि पालिका हद्दीतील नामवंत डॉ. सुनील वाडकर (Dr Sunil Wadkar) यांना अटक करण्यात आली आहे. MBBS चे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि चालवत असलेल्या हायवे हॉस्पिटलची अधिकृत नोंदणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद यांच्याकडे नसताना बेकायदेशीर वैद्यकीय प्रॅक्टीस करून रुग्ण आणि शासनाची फसवणूक केल्याचा आरोप सध्या त्यांच्यावर आहे.
काय आहे प्रकरण?
मीरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक पथक आणि वसई तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. वाडकर यांच्या रुग्णालयात छापा मारला असता त्यांच्याकडे अधिकृत वैद्यकीय प्रमाण पत्र, वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असणारे कागदपत्र मिळाले नाहीत, त्यांना मागितले तर त्यांनी समाधानकारक उत्तर दिली नाहीत.
कागदपत्रं तपासून विरार पोलिसात गुन्हा
महाराष्ट्र वैद्यकीय परिषद यांच्याकडे नोंदणी नसल्याच्या बाबी लक्षात आल्यावर वसई तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योजना जाधव यांच्या माध्यमातून सर्व कागदपत्रांची पडताळणी करून विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
वसई तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाण्यात भादवी कलम 419, 420 सह महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीस अधिनियम 1961 चे कलम 33, 37 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विरार पोलीस करीत आहेत.
संबंधित बातम्या :
मालेगाव दंगलीतील संशयित आरोपी शरण, पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीसह पोलिसांवर आरोपांच्या फैरी
वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसाच्याच गळ्यात टाकली दोर, औरंगबादेत दोघे अटकेत
औरंगाबादेत बोगस लस प्रमाणपत्र देणारे सरकारी डॉक्टर व नर्सच्या टोळीचा पर्दाफाश!