माझे वडील IPS, मी पोलीस उपनिरीक्षक, तरुणीला लग्नाची मागणी, पंढरपुरातील भामटा गजाआड
आरोपी रमेश भोसले हा गेल्या सहा महिन्यांपासून तक्रारदार तरुणी आणि तिच्या कुटुंबाच्या संपर्कात होता. माझे वडील आयपीएस अधिकारी आहेत, तर मी मंगळवेढा येथे पोलीस उपनिरीक्षक आहे, अशी थाप त्याने पीडित कुटुंबाला ठोकली होती.
पंढरपूर : माझे वडील आयपीएस अधिकारी आहेत, तर मी मंगळवेढा येथे पोलीस उपनिरीक्षक (Sub-Inspector of Police) आहे, असं खोटं सांगून भामट्याने पोलिसात भरतीसाठी इच्छुक तरुणीची फसवणूक (Cheating) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर शहरातील (Pandharpur) रमेश सुरेश भोसले याने तरुणीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. भामट्याने तरुणीला लग्नाचीही मागणी घातली होती. त्याच्याविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
आरोपी रमेश भोसले हा गेल्या सहा महिन्यांपासून तक्रारदार तरुणी आणि तिच्या कुटुंबाच्या संपर्कात होता. माझे वडील आयपीएस अधिकारी आहेत, तर मी मंगळवेढा येथे पोलीस उपनिरीक्षक आहे, अशी थाप त्याने पीडित कुटुंबाला ठोकली होती.
बनावट ओळखपत्र आणि आधारकार्ड
आपण पोलीस उपनिरीक्षक आहोत, याची खात्री त्यांना पटावी यासाठी त्याने पोलिस अधिकाऱ्याचा गणवेश देखील खरेदी केला होता. तर पोलीस उपनिरीक्षक असल्याचे बनावट ओळखपत्र आणि बनावट आधारकार्ड देखील आरोपीने बनवून घेतले होते.
लग्नाची मागणी
बोगस आधार कार्ड दाखवत तुला पोलीस भरतीसाठी मदत करतो, असं खोटं आश्वासन त्याने तरुणीला दिलं. हळूहळू लग्नाचीही मागणी घालू लागला, तेव्हा मुलीला संशय आला. त्यामुळे तिने थेट पंढरपूर पोलीस स्टेशन गाठले, त्यावेळी त्याच्या बनावटपणाचा पर्दाफाश झाला. तोतया पोलीस अधिकाऱ्याच्या अखेर मुसक्या आवळल्या असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली .
संबंधित बातम्या :
‘हा’ माझा बायको पार्वती… पत्नीला पुरुषांचं जननेंद्रिय, फसवणुकीचा दावा करत नवरा सुप्रीम कोर्टात
अजितदादांच्या पीएशी ओळख असल्याचा बनाव, पुण्यात तरुणाला दहा लाखांचा गंडा
बँकेतून काढलेले पैसे मोजू लागला, एवढ्यात भामट्याने रोखलं, हातचलाखीनं लांबवले तब्बल 31 हजार!