VIDEO | चार अल्पवयीन मुलांचा येरवड्यात हैदोस, हॉकी स्टिकने दुकानांतील सामानाची तोडफोड

| Updated on: Oct 21, 2021 | 1:01 PM

दुकानदार दुकानात ग्राहकांना सामान देत असतानाच चार जणांनी येऊन हॉकी स्टिकने दुकानातील सामानाची तोडफोड केली. यामध्ये नेमका किती ऐवज चोरीला गेला हे अद्याप समजू शकले नाही.

VIDEO | चार अल्पवयीन मुलांचा येरवड्यात हैदोस, हॉकी स्टिकने दुकानांतील सामानाची तोडफोड
पुण्यात अल्पवयीन मुलांकडून दुकानात तोडफोड
Follow us on

पुणे : येरवडा जयप्रकाश नगर येथे चार अल्पवयीन मुलांनी दोन दुकाने फोडली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. दहशत माजवण्यासाठी हा प्रकार करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील येरवडा परिसरात दहशत माजवण्याच्या दृष्टीने असेच अनेक छोटे मोठे प्रकार वारंवार घडत असतात.

हॉकी स्टिकने दुकानातील सामानाची तोडफोड

या घटनेमुळे पुन्हा एकदा येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुकानदार दुकानात ग्राहकांना सामान देत असतानाच चार जणांनी येऊन हॉकी स्टिकने दुकानातील सामानाची तोडफोड केली. यामध्ये नेमका किती ऐवज चोरीला गेला हे अद्याप समजू शकले नाही.

येरवडा परिसरात वाढती गुन्हेगारी

यापूर्वीही असे अनेक प्रकार येरवडा परिसरामध्ये झालेले आहेत. येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर आहे. अवैध धंदे आणि अशा युवकांचे टोळके हे दहशत माजवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फोफावले आहेत. दहशत माजवणाऱ्यांच्या विरोधात येरवडा पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी वारंवार करण्यात येत आहेत.

पाहा व्हिडीओ :

पिंपरीत दुकानदारावर कोयत्याने सपासप वार 

याआधी, अल्पवयीन मुलांच्या माध्यमातून दुकानदारांकडून हप्ता वसुली होत असल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये समोर आला होता धक्कादायक म्हणजे एका दुकानदाराने हप्ता दिला नाही, म्हणून कोयत्याने सपासप वार केले होते.

काय झालं होतं

पिंपरी चिंचवडच्या डिलक्स चौकात हप्ता मागण्यांसाठी आलेल्या अल्पवयीन मुलांनी रेडिमेड कपड्याच्या दुकानात मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. त्याचप्रमाणे दुकान मालकावरही कोयत्याने सपासप वार केले. मिस्टर मॅड या दुकानात घडलेली ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या प्रकारामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात व्यापारी वर्गात मोठी घबराट पसरली आहे.

दरम्यान, दुकानात तोडफोड करणारे अल्पवयीन आरोपी हे पिंपरी चिंचवडचे स्थानिक रहिवासी असल्याची माहिती आहे. दुकान मालकाच्या तक्रारीवरुन पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये तिघा अल्पवयीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

संबंधित बातम्या :

जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचं सांगून खंडणीवसुली, औरंगाबादमध्ये दादागिरी करणारे दोघे रंगेहाथ

CCTV VIDEO | औरंगाबादेत गुंडगिरी, उद्योजक राम भोगलेंच्या कंपनीत घुसून 10 ते 15 जणांची CEO ना मारहाण

VIDEO | काम का देत नाही? प्रश्न विचारणाऱ्या कामगाराला कंपनी मालकाकडून चोप