सोन्याचा भाव देणारी व्हेल माशाची उलटी, रत्नागिरी चौघे संशयित तस्कर जेरबंद

व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीबाबत अज्ञात व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार सापळा रचून वन विभाग रत्नागिरी आणि स्थानिक पोलीसांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे सहा कोटींची व्हेल माशाची उलटी आणि एक कार जप्त करण्यात आली आहे.

सोन्याचा भाव देणारी व्हेल माशाची उलटी, रत्नागिरी चौघे संशयित तस्कर जेरबंद
रत्नागिरीत देवमाशाची उलटी जप्त
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 8:00 AM

रत्नागिरी : व्हेल माशाची सहा कोटी रुपये किमतीची उलटी जप्त करण्यात आली आहे. तस्करीच्या संशयाखाली चौघांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात ही गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीबाबत अज्ञात व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार सापळा रचून वन विभाग रत्नागिरी आणि स्थानिक पोलीसांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे सहा कोटींची व्हेल माशाची उलटी आणि एक कार जप्त करण्यात आली आहे.

संशयित आरोपीकडून 6.2 किलो वजनाची व्हेल माशाची उल्टी (Ambergris) जप्त करण्यात आली आहे. आरोपींच्या विरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 अन्वये परिक्षेत्र वन अधिकारी, चिपळूण यांच्याकडील प्र. गु. रि. 02/2021 अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

देवमाशाची उलटी इतकी का महाग?

देवमाशाची उलटी म्हणजेच अ‍ॅम्बरग्रिस हे हलक्या राखाडी किंवा काळ्या रंगाचे असते. तो मेणासारखा एक दगडसदृश्य पदार्थ असतो. व्हेल माशाने तो तोंडातून बाहेर फेकला की तो वाहत किनाऱ्यावर येतो. सुगंधी द्रव्ये, सुगंधी अत्तर, बॉडी स्प्रे, परफ्युम आणि अनेक औषधे तयार करण्यासाठी ते वापरले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ते सोन्यासारख्या महाग किंमतीने विकले जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी त्याची तस्करी करुन छुप्या पद्धतीने खरेदी-विक्री होत असल्याचे प्रकार उघडकीस येतात. अ‍ॅम्बरग्रीस हे व्हेल माशाच्या शरीरात तयार होत असून देवमाशाने तोंडावाटे ही उलटी बाहेर फेकल्यानंतर बहुतांश वेळा ते समुद्र किनारी सापडते.

देवगडचा प्रामाणिक मच्छिमार

दुसरीकडे, व्हेल माशाच्या उलटीची म्हणजेच तस्करी करणारे रॅकेट नुकतेच ठाण्यात पकडले होते, त्याचवेळी सिंधुदुर्गातील देवगडमध्येही एका मच्छिमाराला किनाऱ्यावर व्हेल माशाची उलटी सापडली होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या उलटीला सोन्याचा भाव आहे, मात्र मच्छिमाराने प्रामाणिकपणा दाखवत ही उलटी वन विभागाच्या ताब्यात दिली होती.

संबंधित बातम्या

मुंबईत हायप्रोफाईल वस्तीत Ambergris ची खरेदी-विक्री, पोलिसांकडून सापळा रचत टोळीचा पर्दाफाश

एका क्षणात झाला करोडपती! मच्छिमाराच्या हाती काय लागलं हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.