दहा हजारांनी स्वस्त सोन्याचे आमिष, सांगलीत दाम्पत्याकडून 52.9 लाखांना गंडा

कमी दरात सोने देतो, असे सांगत सांगलीमध्ये सहा जणांना या दाम्पत्याने 52.9 लाख रुपयांना गंडवले. 10 हजार रुपये कमी किमतीत सोने मिळेल, असे खोटे सांगून त्यांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले गेले होते.

दहा हजारांनी स्वस्त सोन्याचे आमिष, सांगलीत दाम्पत्याकडून 52.9 लाखांना गंडा
सांगली शहर पोलीस ठाणे
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 8:47 AM

सांगली : कमी दरात सोने देतो, असे सांगत सांगलीमध्ये एका दाम्पत्याने सहा जणांना गंडा घातल्याचं समोर आलं आहे. दहा हजारांनी स्वस्त सोनं देण्याच्या आमिषाने दाम्पत्याने पीडितांना पैसे गुंतवण्यास सांगितलं होतं. एकूण 52 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

कमी दरात सोने देतो, असे सांगत सांगलीमध्ये सहा जणांना या दाम्पत्याने 52.9 लाख रुपयांना गंडवले. 10 हजार रुपये कमी किमतीत सोने मिळेल, असे खोटे सांगून त्यांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले गेले होते. विराज विजय कोकणे आणि दीपाली विराज कोकणे असे फसवणूक करणाऱ्या आरोपी दाम्पत्याचे नाव आहे.

दाम्पत्य फरार, फसवणुकीचा गुन्हा 

सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये कोकणे दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कोकणे दाम्पत्य फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अन्य कुणाची जर या दाम्पत्यने फसवणूक केली असेल तर सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन सांगली शहर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी केले आहे.

भंडाऱ्यात सोनं पॉलिश करण्याच्या बहाण्याने लूट

दुसरीकडे, दुपारच्या वेळेत पुरुष मंडळी घरी नसल्याचे हेरुन दोन भामट्यांनी दागिने चमकवण्याच्या नावावर महिलांचे सोने घेऊन पळ काढल्याची घटना भंडारा तालुक्याच्या भिलेवाडा येथे नुकतीच घडली होती. सेल्समन बनून आलेल्या 20-21 वर्ष वयोगटातील भामट्यांनी 18 हजार रुपयांचे सोने पळवून नेले होते. या प्रकरणी कारधा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

सेलमन्स बनून आले, दागिने घेऊन गेले

भिलेवाडा येथील सुरभी संदीप गाढवे यांच्या घरी दुपारच्या सुमारास दोन अनोळखी तरुण सेलमन्स बनून आले. आपण तांबे, चांदी, सोने चमकविण्याचे प्रॉडक्ट घेऊन आलो असल्याची बतावणी करुन सुरुवातीला तांबे, पितळीचे दागिने चमकवून देतो असे सांगून त्यांनी महिलांना बोलण्यात गुंतवलं. महिलांनीही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत आपले दागिने भामट्यांच्या हवाली केले.

उकळत्या पाण्यात दागिने साफ करतो, महिलांची दिशाभूल, सोने घेऊन फरार

सोन्याची गळसोरी, एक डोरले, सोन्याचे छोटे मनी तसंच विविध प्रकारचे सोन्याचे दागिने महिलांनी भामट्यांकडे हवाली केले. गॅसवर उकळत्या पाण्यात दागिने साफ करून देतो असे सांगून मोठ्या चलाखीने गॅसवरील भांडयात दागिने ठेवल्याचे भासवून या दोन आरोपींनी तिथून पळ काढला.

पोलिसांत गुन्हा नोंद

काही वेळानंतर आपली फसवणूक झाल्याचे कळाल्यावर घरचे पुरुष मंडळी आल्यावर संबधित प्रकार उघडीस आला. त्यानंतर कारधा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरांचा शोध सुरु केला. या घटनेनंतर कोणी अनोळखी व्यक्ती दागिने साफ करण्याची बतावणी करत असेल तर वेळीच सावधान होण्याची गरज पुन्हा व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या :

नाशिकमध्ये ज्वेलर्समधील लुटालूट थांबेना, आता भरदिवसा डल्ला, 7 लाखांचे दागिने हातोहात लांबवले

सोनं पॉलिश करण्याच्या बहाण्याने दागिने लांबवले, 20 वर्षांच्या पोरांचा प्रताप, पोलिसांकडून शोध सुरु

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.