Molestation | सांगलीत माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दिरावर गुन्हा, महिलेच्या विनयभंगाचा आरोप
संशयित राजू कोरेला अटक करण्यासाठी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे प्रमुख नितिन चौगुले यांनी सांगलीचे एसपी दीक्षित गेडाम यांना निवेदन दिले आहे. राजू कोरे यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे
सांगली : भाजपाच्या सांगली (Sangli) माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दिराकडून एका महिलेचा विनयभंग (Molestation) करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू कोरे असे संशयितांचं नाव असून तो भाजप नेता (BJP) आणि माजी सरपंच आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन विश्रामबाग पोलीसांनी राजू कोरेवर गुन्हा दाखल केला आहे.
राजू कोरेंच्या अटकेसाठी आक्रमक
संशयित राजू कोरेला अटक करण्यासाठी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे प्रमुख नितिन चौगुले यांनी सांगलीचे एसपी दीक्षित गेडाम यांना निवेदन दिले आहे. राजू कोरे यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. राजू कोरे यांनी अनेक महिलांच्याबाबत असे प्रकार केल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने दिला आहे.
शासकीय बंगल्यात महिलांशी गैरप्रकार?
राजू कोरे यांची वहिनी जिल्हा परिषद अध्यक्षा असताना त्यांच्या शासकीय बंगल्यात सुद्धा महिलांशी गैरप्रकार आणि मारामारी होत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी राजकुमार कोरे याला लवकरच अटक केली जाईल असे विश्रामबाग पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
संबंधित बातम्या :
मुंबई लोकलमध्ये गोव्याच्या तरुणाचा महिलेला किस, सात वर्षांनी शिक्षा
लहान मुलीचा विनयभंग, शिक्षकाला बाईने दप्तराने बडवलं, गावकऱ्यांनी तुडवलं
दहावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, राष्ट्रवादीच्या नेत्याचं पोलिसात आत्मसमर्पण
भाजपच्या कार्यक्रमाला का गेलीस? शिवसेना आमदाराची भावजयीला मारहाण, विनयभंगाचा गुन्हा