Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangli Crime | आधी चहात फिनेल, मग गुलाबजाममध्ये उंदीर मारायचं औषध; नवऱ्याच्या जीवावर उठलेली बायको गजाआड

पतीला जेवणाच्या डब्यातील खाद्य पदार्थात विषारी औषध घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील गौरी प्रसन्ना खंकाळे हिच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sangli Crime | आधी चहात फिनेल, मग गुलाबजाममध्ये उंदीर मारायचं औषध; नवऱ्याच्या जीवावर उठलेली बायको गजाआड
नवऱ्याच्या हत्येचा प्रयत्न, बायकोला अटकImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 10:36 AM

सांगली : पत्नीने पतीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात (Sangli Crime) उघडकीस आली आहे. जेवणात तब्बल तीन वेळा विष घालून बायकोने नवऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न (attempt to murder) केला, मात्र प्रत्येक वेळी पतीचे प्राण बचावले. एकदा जेवणाच्या डब्यात, तर दुसऱ्यांदा चहामध्ये फिनेल घातले. तिसऱ्या वेळी गुलाबजाममध्ये उंदीर मारण्याचे औषध घातले होते. मात्र पत्नीने वारंवार गुलाबजाम खाण्याबाबत केलेल्या आग्रहामुळे पतीच्या मनात शंका निर्माण झाली. त्याने खडसावून विचारताच पत्नीने कृत्याची कबुली दिली. त्यानंतर पतीने पोलिसात धाव घेतली. इस्लामपूर पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

पतीला जेवणाच्या डब्यातील खाद्य पदार्थात विषारी औषध घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील गौरी प्रसन्ना खंकाळे हिच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पती प्रसन्न खंकाळे यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर पत्नी गौरी हिला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

17 मार्चला गौरी प्रसन्न खंकाळे हिने पती प्रसन्न यांच्या जेवणाच्या डब्यात फिनेल घातले होते. त्यानंतर चार दिवसांनी पुन्हा चहामध्ये फिनेल घातले. त्यानंतर सोमवारी चार तारखेला गौरीने सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास प्रसन्न यांना गुलाबजाम खायला दिले. प्रसन्न यांना त्यात बुरशीच्या औषधाचे तुकडे दिसले. बायकोने गुलाबजामुन खाण्याचा खूपच आग्रह धरला. त्यावरुन प्रसन्न यांना शंका आली. त्यांनी ते खाल्ले नाहीत.

बायकोची कबुली

गुलाबजामुन मधून उंदीर मारण्याचे औषध घालण्यात आले होते. त्यावर त्यांनी तिला हे काय आहे, असं खडसावून विचारलं. तेव्हा बायकोने चुकीची कबुली देत माझी चूक झाली, माफ करा, मी पुन्हा असे करणार नाही, असे सांगितले. त्यावरुन हा प्रकार उघडकीस आला. यानुसार तिच्यावर कलम 307 आणि 328 नुसार इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

गळा आवळून बायकोनं नवऱ्याला संपवलं! हत्येआधी पतीला इलेक्ट्रीक पोलला लटकवलं

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या, आरोपी पत्नीसह प्रियकर अटकेत

मायलेकाने बापाला संपवलं, मृतदेह सातव्या मजल्यावरुन फेकला, बँक अधिकाऱ्याच्या हत्येने मुंबईत खळबळ

सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?.
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका.
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?.
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं..
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं...
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली.
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.