VIDEO | नाग पकडून Stunt बाजी, सांगलीच्या तरुणाची मस्ती, Viral Video मुळे कारवाई
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील मौजे बावची येथील प्रदीप अशोक अडसुळे याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. प्रदीपने नाग पकडून त्याच्या सोबत व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केला होता.
सांगली : नाग पकडून त्याच्यासोबत व्हिडीओ शूट (Viral Video) करणं तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीच्या (Sangli Crime) वाळवा तालुक्यातील मौजे बावची भागात हा प्रकार घडला. प्रदीप अशोक अडसुळे (वय 22 वर्ष) असं या तरुणाचं नाव आहे. त्याच्यावर वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नाग (Cobra) पकडून त्याच्यासोबत व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील मौजे बावची येथील प्रदीप अशोक अडसुळे याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. प्रदीपने नाग पकडून त्याच्या सोबत व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केला होता.
वन विभागाची कारवाई
ही कारवाई विजय माने (उपवनसंरक्षक, सांगली), डॉ अजित साजने (सहाय्यक वनसंरक्षक सांगली) यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन जाधव (वनक्षेत्रपाल शिराळा) , सुरेश चरापले (वनपाल इस्लामपूर) आणि अमोल साठे (वनरक्षक बावची), निवास उगले आणि भगवान गायकवाड यांच्या पथकाने केली आहे. त्याच्यावर वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
घरात घुसला कोब्रा, वाचवण्यासाठी गेलेल्या सर्पमित्रावरच करतोय हल्ला, पाहा Viral Video
अंडी वाचवण्यासाठी कोंबडीनं घेतला ‘कोब्रा’शी पंगा; आपल्या चोचीनं केला हल्ला, अखेर…
अजब गावात गजब प्रकार, नागाने जबड्यातून बाहेर काढला मृत घोणस, कोल्हापुरात चर्चा