पिशवी आडवी लावून हातचलाखीने मोबाईल लंपास, सांगलीत टोळी जेरबंद

कोल्हापूर, सातारा, कर्नाटक आणि सांगली शहरात आठवडा बाजार, एसटी स्टॅण्ड परिसर याठिकाणी आणखी मोबाईल चोरी केल्याचे सांगितले. या आरोपींकडून चोरी केलेले 15 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

पिशवी आडवी लावून हातचलाखीने मोबाईल लंपास, सांगलीत टोळी जेरबंद
सांगलीत मोबाईल चोर अटकेत
Follow us
| Updated on: Oct 17, 2021 | 4:18 PM

सांगली : सांगली शहरात आणि उपनगरात आठवडा बाजारातील गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात आलं आहे. सांगली शहर पोलिसांनी कारवाई करत मोबाईल चोरीचे एकूण 15 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

काय आहे प्रकरण?

सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये झालेल्या मोबाईल चोरी आणि आठवडा बाजारातील गर्दीचा फायदा घेऊन घडणाऱ्या मोबाईल चोरीबाबत सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने दोघा संशयितांना ताब्यात अधिक चौकशी केली. तेव्हा त्यांनी वयस्कर व्यक्ती आणि महिला यांच्यावर पाळत ठेवून, गर्दीचा फायदा घेत वरच्या खिशात ठेवलेले मोबाईल तसेच पर्समध्ये ठेवलेले मोबाईल हे पिशवी आडवी लावून हातचलाखीने चोरी केल्याची कबुली दिली.

तसेच कोल्हापूर, सातारा, कर्नाटक आणि सांगली शहरात आठवडा बाजार, एसटी स्टॅण्ड परिसर याठिकाणी आणखी मोबाईल चोरी केल्याचे सांगितले. या आरोपींकडून चोरी केलेले 15 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

पाहा व्हिडीओ :

ज्वेलरच्या दुकानातून 20 तोळे सोन्यासह कामगार पसार

याआधी, सांगलीतून सोने घेऊन पळून गेलेल्या कामगारासह दोघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये चोरीचे 9 तोळ्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. सांगली शहर पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये ही कारवाई केली.

काय आहे प्रकरण?

सांगलीच्या आदिनाथ चेन्स गणपती पेठ या दुकानात काम करणारा गलाई कामगार 18 ते 20 तोळे सोने घेऊन पसार झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सांगली शहर पोलिसांनी त्या फरार कामगारांच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तीला मुंबईतून ताब्यात घेतले, त्यावेळी आरोपी हा पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे गेल्याची माहिती मिळाली.

आरोपींना पश्चिम बंगालमध्ये बेड्या

यानंतर सांगली शहर पोलिसांचे तपास पथक हे पश्चिम बंगाल येथे आरोपी कामगाराच्या शोधासाठी गेले. तांत्रिक पद्धतीने तपास करत असताना आरोपी सुकुर अली शहा आणि त्याचे साथीदार राज भोला बाग आणि राहुल रबी टंटी यांना चंडीताला, कोलकाता येथून शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

संबंधित बातम्या :

दारुच्या नशेत 32 वर्षीय तरुणाची पित्याला बेदम मारहाण, औरंगाबादेत वृद्धाचा मृत्यू

सोन्याची चेन घेत ऑनलाईन पैसे पाठवल्याचा बनाव, तोतया आयकर अधिकाऱ्याचा 1.8 लाखांना गंडा

नवी मुंबईत मौजमस्ती करण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून वाहन चोऱ्या

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.