महाबळेश्वरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शिवसेना नेत्याच्या दोन मुलांसह 11 जणांवर गुन्हे
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाबळेश्वर नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते डी. एम. बावळेकर यांच्या दोन मुलांना अटक कऱण्यात आली आहे
सातारा : महाबळेश्वरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षाच्या दोन मुलांसह 11 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर अत्याचाराला वाचा फुटली.
काय आहे प्रकरण?
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सागर उर्फ आबा हनुमंत गायकवाड (वय -30 वर्ष) आणि आशुतोष मोहन बिरामणे (रा. महाबळेश्वर) यांना ताब्यात घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
शिवसेना नेत्याची दोन मुलं
या दोघांना सातारा येथील जिल्हा विशेष सत्र न्यायालयाकडून 27 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर गुरुवारी या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये महाबळेश्वर नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते डी. एम. बावळेकर यांचे दोन सुपुत्र सनी बावळेकर आणि योगेश बावळेकर यांचादेखील समावेश असल्यामुळे महाबळेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे.
साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून मुलीची हत्या
दुसरीकडे, सातारा जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून 22 वर्षीय तरुणाने 18 वर्षीय मुलीची भरदिवसा भर चौकात गळा चिरुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित घटना ही पाटण तालुक्यातील चाफळ येथे घडली आहे. विशेष म्हणजे मुलीची हत्या करुन आरोपी पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने स्वत:हून आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. चैतन्या बाळू बंडलकर असं हत्या झालेल्या मुलीचं नाव आहे. तर अनिकेत मोरे असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.
आरोपी दुचाकीने आला, मुलीसोबत न बोलताच तिची हत्या
संबंधित घटना ही चाफळ येथीव स्वागत कमानीजवळ सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आरोपी अनिकेत हा दुचाकीने आला होता. तो चैतन्यासोबत काहीच बोलला नाही. त्याने गाडीवरुन उतरुन आधी चैतन्याचं तोंड दाबलं. त्यानंतर दुसऱ्या हातात असलेल्या चाकूने तिची गळा चिरुन हत्या केली. चैतन्या रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर खाली कोसळली. या हल्ल्यात चैतन्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी अनिकेत दुचाकीने पोलीस ठाण्यात गेला. तिथे जमा होऊन त्याने आपल्या कृत्याची पोलिसांना माहिती दिली. दुसरीकडे गावातही खळबळ उडाली.
आरोपी अनिकेतची आधी मुलीच्या आईकडे लग्नाची मागणी
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, मृतक चैतन्याची आई जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहे. त्यांची काही दिवसांपूर्वी चाफळ नजीकच्या नानेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत बदली झाली होती. त्यामुळे त्या मुलीसह चाफळला राहत होत्या. आरोपी अनिकेत आणि चैतन्या एकाचा तालुक्यातील असल्याने त्यांचा परिचय होता. त्यात अनिकेतचे चैतन्यावर एकतर्फी प्रेमही होते. त्यातून तो तिला भेटायला येत होता. अनिकेतने काही दिवसांपूर्वी चैतन्याच्या आईची भेट घेतली होती. त्यावेळी त्याने चैतन्यासोबत लग्नाची मागणी घातली होती. पण अनिकेत मजुरीवरील शेतातील कामे करतो. त्यामुळे याबाबत पुढे काही झालं नाही. त्यानंतर अचानक हत्येची घटना समोर आली.
हेही वाचा :
संतापजनक! आधी त्यानं मुलीचा गळा चिरला, नंतर थेट पोलीस ठाण्यात गेला, महाराष्ट्र हादरला
वाढदिवशीच पेट्रोल टाकून जिवंत जाळले, धारुर घाटात अर्धवट जळालेला तरुण पाहून खळबळ, बीड हादरलं