VIDEO | बायकोशी भांडणातून स्वतःचं घर पेटवलं, आजूबाजूची दहा घरं जळून खाक, ग्रामस्थांनी धू-धू धुतलं

पाटण तालुक्यातील माजगाव या गावातील संजय पाटील आणि त्यांची पत्नी पल्लवी यांची घरगुती कारणातून भांडणे सुरु होती. भांडण एवढ्या टोकाला गेले की पतीने स्वतःच्या घराला आग लावली.

VIDEO | बायकोशी भांडणातून स्वतःचं घर पेटवलं, आजूबाजूची दहा घरं जळून खाक, ग्रामस्थांनी धू-धू धुतलं
अकरा संसाराची राखरांगोळी करणारा संजय पाटील दारुडा आणि माथेफिरू
Follow us
| Updated on: Oct 19, 2021 | 11:06 AM

सातारा : पत्नीशी भांडण झाल्यानंतर स्वतःचं घर जाळताना आजूबाजूची दहा घरंही जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.  सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माजगाव येथे हा प्रकार घडला आहे. या घटनेत सुमारे पन्नास लाख रुपयाहून अधिक किमतीचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी संबंधित पतीवर गुन्हा दाखल केला आहे.

घरगुती भांडणातून आग लावली

पाटण तालुक्यातील माजगाव या गावातील संजय पाटील आणि त्यांची पत्नी पल्लवी यांची घरगुती कारणातून भांडणे सुरु होती. भांडण एवढ्या टोकाला गेले की पतीने स्वतःच्या घराला आग लावली.

सिलेंडरचा भडका, दहा घरं पेटली

आग लावली तेव्हा घरातील सिलेंडरनेही पेट घेतला. नंतर या आगीने रौद्ररुप धारण करत आजूबाजूच्या सुमारे दहा घरांना त्याचा फटका बसला. ही सर्व घरे जळून खाक झाली. या आगीत सुमारे पन्नास लाखाहून अधिक रुपयाचे नुकसान झाले आहे.

याबाबत आरोपी पती संजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मल्हारपेठ पोलिसांनी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. जाळपोळ करणाऱ्या पतीला ग्रामस्थांनी मात्र आगीतून बाहेर काढत चांगला चोप दिला.

पाहा व्हिडीओ :

नागपुरात तीन घरं पेटली

दुसरीकडे, नागपूर जिल्ह्यात काटोल तालुक्यातील डोरली भिंगारे गावात जून महिन्यात सकाळी 6 वाजताच्या सुमारास राधाबाई टूले यांच्या घरातील एलपीजी गॅस सिलेंडरमधील गॅस लिक झाल्याने त्यांच्या घरी आग लागली होती. पाहता पाहता ही आग शेजारी राहणाऱ्या विठाबाई टुले, कुमुद नारायण सरोदे यांच्या घरापर्यंत पोहोचली.

या आगीत तिन्ही घरं आणि घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. दुर्दैवाने विठाबाई टुले या महिला शेतकऱ्याने खरीप हंगामासाठी बियाणे आणि खत घेण्याकरिता जमा केलेले 50 हजार रुपये देखील या आगीत जळून खाक झाले होते.

संबंधित बातम्या :

नागपुरात एलपीजी सिलेंडरमधील गॅस लिक, आगीत तीन घरं जळून खाक

डोंबिवलीत कामगार वसाहतीत सिलेंडर स्फोट; भीषण आगीत एका कामगाराचा मृत्यू, दुसरा गंभीर

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.