चार दिवसांपूर्वी विवाह, साताऱ्यातील तरुणाचा पाण्याच्या टाकीवरुन आत्महत्येचा प्रयत्न

सातारा नगरपालिकेच्या समोर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी समोर आला. गुरुवार पेठ भागात राहणाऱ्या या तरुणाने अक्षरशः शोले स्टाईल थरार केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला वेळीच सुखरुप खाली उतरवण्यात यश आले आहे.

चार दिवसांपूर्वी विवाह, साताऱ्यातील तरुणाचा पाण्याच्या टाकीवरुन आत्महत्येचा प्रयत्न
साताऱ्यात नवविवाहित तरुणाचा शोले स्टाईल आत्महत्येचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 7:27 AM

सातारा : सातारा जिल्ह्यात आत्महत्येच्या प्रयत्नाचा थरार पाहायला मिळाला. विशेष म्हणजे अवघ्या चार दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन करत तरुणाने जीव देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सुदैवाने त्याचा जीव वाचवण्यात पोलिसांना यश आलं.

काय आहे प्रकरण?

सातारा नगरपालिकेच्या समोर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी समोर आला. गुरुवार पेठ भागात राहणाऱ्या या तरुणाने अक्षरशः शोले स्टाईल थरार केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला वेळीच सुखरुप खाली उतरवण्यात यश आले आहे.

नवविवाहित तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अवघ्या चार दिवसांपूर्वी या तरुणाचे लग्न झाले आहे. मात्र कौटुंबिक वादामुळे मानसिक ताण निर्माण होऊन तो पाण्याच्या टाकीवर चढला आणि त्यातून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

परिसरात बघ्यांची गर्दी

दरम्यान, तरुण थेट पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी तरुणाला समजावून त्याला खाली उतरवले. त्याचे व्यवस्थित समुपदेशन करुन त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कोकरे यांनी दिली आहे. तरुण सुखरुप असल्यामुळे सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला.

दारुसाठी ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा, मद्यपी 80 फूट उंच टॉवरवर

दुसरीकडे, दारुसाठी झालेला ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा नुकताच साताऱ्यात पाहायला मिळाला होता. नातेवाईक दारु देत नाहीत, म्हणून मद्यपी विजेच्या मुख्य टॉवरवर चढल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला होता. त्याच्या सुटकेसाठी विद्युत प्रवाह बंद करुन बचाव मोहीम हाती घ्यावी लागली होती. कोयनानगर येथील दास्तान गावात घडलेल्या घटनेचा व्हिडीओ समोर आला.

मद्यपी बेळगाव आथणी येथील रहिवासी होता. त्याचे दारुचे व्यसन सोडवण्यासाठी नातेवाईकांनी त्याला कोयनानगर येथील व्यसनमुक्ती केंद्रात आणले होते. मात्र दारु प्यायची असल्याचा हट्ट करत तो चक्क वीज वाहिनीच्या हाय व्होल्टेज टॉवरवरच चढला आणि जवळपास 11 तास धिंगाणा घातला.

संबंधित बातम्या :

आई-बहिणीला इंजेक्शन देऊन संपवलं, आत्महत्येचा प्रयत्न करणारी 30 वर्षीय डॉक्टर बचावली

‘सिंघम’ पोलीस लाथ मारुन घरात शिरला, औरंगाबादेत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला वाचवलं

वाशी खाडी पुलावरुन आत्महत्येचा प्रयत्न, वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने तरुण बचावला

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.