Aryan Khan | आर्यन खानसंबंधी कथित खंडणी प्रकरणाच्या तपासाला पूजा ददलानीमुळे ब्रेक?

मुंबई पोलिसांनी गेल्या महिन्यातच SIT तयार केली होती, परंतु जोपर्यंत पूजा पोलिसांना निवेदन देत नाही, तोपर्यंत या प्रकरणी एफआयआर नोंदवता येणार नाही.

Aryan Khan | आर्यन खानसंबंधी कथित खंडणी प्रकरणाच्या तपासाला पूजा ददलानीमुळे ब्रेक?
Aryan Khan
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 12:34 PM

मुंबई : कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज (drugs-on-cruise case ) प्रकरणातील कथित खंडणी प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची एसईटी (विशेष चौकशी पथक) करत होती, परंतु आता मुंबई पोलिसांनी एसईटीच्या तपासाला ब्रेक लावावा लागला आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसुली आणि लाच यातील सीमारेषा अत्यंत धूसर असल्याने या प्रकरणाचा तपास काही काळ थांबवावा लागत आहे. तर दुसरे सर्वात मोठे कारण म्हणजे मुंबई पोलिसांनी अनेक वेळा समन्स पाठवूनही बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची (Shah Rukh Khan) मॅनेजर पूजा ददलानी (Pooja Dadlani) अद्याप पोलिसांसमोर या प्रकरणी तिचा जबाब नोंदवण्यासाठी आलेली नाही. याशिवाय मुंबई पोलीस एनसीबीच्या दक्षता टीमच्या तपासाच्या अहवालाचीही वाट पाहत आहेत.

पूजा ददलानीच्या जबाबाअभावी तपास अडला

एका अधिकाऱ्याने सांगितले की, पूजा प्रकृतीचे कारण सांगून पोलिसांसमोर तिचा जबाब नोंदवण्यासाठी आली नाही. मुंबई पोलिसांनी गेल्या महिन्यातच SIT तयार केली होती, परंतु जोपर्यंत पूजा पोलिसांना निवेदन देत नाही, तोपर्यंत या प्रकरणी एफआयआर नोंदवता येणार नाही. पोलिसांनी सांगितले की SIT पूजाला कोणत्याही प्रकारचा कायदेशीर दबाव टाकून चौकशीसाठी बोलावू शकत नाही, कारण SIT फक्त तपास करत आहे आणि कोणत्याही FIR चा तपास करत नाही. या कारणास्तव, मुंबई पोलिसांनी SIT तपास सध्या थांबवला आहे आणि कायदेशीर सल्ला घेत आहे.

काय काय घडलं

क्रूझ ड्रग्स प्रकरणाचे स्वतंत्र पंच प्रभाकर साईल यांनी आरोप केला होता, की केपी गोसावी याने आर्यन खानवर कायदेशीर कारवाई न करण्याच्या नावाखाली पूजा ददलानीकडून पैसे घेतले होते. सॅम डिसूझा याने मुंबई पोलिसांना दिलेल्या निवेदनात सांगितले, की त्यानेच केपी गोसावी याची पूजा ददलानीशी ओळख करून दिली. गोसावीने सॅम डिसूझाला सांगितले की आर्यनकडे ड्रग्ज सापडले नाहीत. गोसावीनेच सॅमची पूजा ददलानीशी ओळख करून देण्यास सांगितले होते.

जेव्हा सॅमला कळलं, की गोसावी फ्रॉड आहे, तेव्हा त्याने सर्व पैसे वसूल करून ददलानीला परत केले. सॅमने मुंबई पोलिसांना सांगितले की सुनील पाटील यांनी त्याच्याशी संपर्क साधला आणि विचारले की तो एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे का, त्यानंतर सॅमने त्याला एनसीबी अधिकाऱ्याचे नाव पाठवले. पाटील यांनी सॅमला सांगितले की, कर्डिलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात केपी गोसावी आणि मनीष भानुशाली नावाचे दोन लोक त्याच्याशी संपर्क साधतील.

दोन ऑक्टोबरला काय काय घडलं

2 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता सॅम ताज प्रेसिडेन्सी हॉटेलमध्ये होता, तेव्हा सुनील पाटील यांनी त्याला सांगितले की क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एका अतिशय प्रभावशाली व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे, सुरुवातीला सॅम म्हणाला की तो व्यस्त असल्यामुळे तो जाऊ शकत नाही पण सुनील पाटील यांच्या बोलण्यामुळे तो ग्रीन गेटकडे गेला.

ग्रीन गेट येथे तो मनीष भानुशालीला भेटला आणि केपी गोसावीने सॅमची एनसीबी अधिकाऱ्यांशी ओळख करून दिल्याबद्दल त्याचे आभार मानले. तिथे गोसावीने त्याला सांगितले की आर्यन खान हा प्रभावशाली व्यक्ती आहे, त्याला अटक करण्यात आली आहे. यानंतर सॅमने पाटील यांना याबाबत माहिती दिली, त्यानंतर पाटील यांनी गोसावीच्या मागे जाण्यास सांगितले, यादरम्यान गोसावी पाटील यांच्या सतत संपर्कात होता.

गोसावीने पाटील यांना सांगिले की आर्यनला पूजा ददलानीशी बोलायचे आहे, तर सॅमला सांगितले की आर्यनकडे ड्रग्ज सापडले नाहीत आणि तो निर्दोष आहे. त्यानंतरच गोसावीने सॅमला सांगितले की आर्यनला दिलासा मिळेल आणि पूजाला संपर्क करण्यास सांगितले. सॅमने गोसावीला सांगितले की आपण दादलानीशी संपर्क करण्याचा प्रयत्न करु. त्यानंतर सॅमने एका मित्राच्या मदतीने पूजाशी संपर्क साधला आणि तिला लोअर परेलला भेटला. पूजा दादलानीने याविषयी आपण ठरवू असं सांगितलं.

सॅमने ददलानीची गोसावीशी ओळख करून दिली. गोसावीने ददलानीला एक लिस्ट दाखविली त्यात आर्यन खानचं नाव नव्हतं आणि सांगितलं की आर्यनजवळ ड्रग्ज सापडला नाही, त्याला या प्रकरणातून बाहेर काढता येऊ शकते. सॅमला 3 ऑक्टोबर रोजी आर्यनवर गुन्हा दाखल झाल्याचे समजले, त्यानंतर त्याने पाटील यांना फोन केला, तेव्हा पाटील यांनी सांगितला की गोसावीने ददलानीकडून 50 लाख रुपये घेतले. गोसावी हा फसवणूक करणार असल्याचं सॅमला कळलं. त्यानंतर सॅमने गोसावीकडून पैसे परत घेतले आणि ददलानीला पैसे परत केले.

संबंधित बातम्या :

प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी मुलाच्या अपहरणाचा बनाव, मुंबईत विवाहितेला अटक

21 वर्षीय नवविवाहितेवर सामूहिक बलात्कार, शाळेतल्या मित्रासह तिघांकडून अत्याचार

40 वर्षीय माजी नगराध्यक्षा राहत्या घरात मृतावस्थेत, अहमदनगरमध्ये खळबळ

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.