सोलापुरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेवर सशस्त्र दरोडा, सात लाखांची लूट

सोलापूर जिल्ह्यात सांगोल्याजवळ असलेल्या वाकी शिवणे गावातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेवर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकला. यामध्ये सात लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.

सोलापुरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेवर सशस्त्र दरोडा, सात लाखांची लूट
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेवर दरोडा
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 1:49 PM

सोलापूर : सोलापुरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेवर मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडला. यामध्ये सात लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. गॅस कटरच्या सहाय्याने दरवाजा तोडून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. अज्ञात आरोपींचा शोध सुरु आहे. याआधी, नुकतीच जालन्याच्या अंबड तालुक्यातील शहागड येथे बुलडाणा अर्बन बँकेवर भरदिवसा सशस्त्र दरोडा पडल्याची घटना समोर आली होती.

सोलापूर जिल्ह्यात सांगोल्याजवळ असलेल्या वाकी शिवणे गावातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेवर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकला. यामध्ये सात लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. या घटनेनंतर सांगोला तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

गॅस कटरने दरवाजा तोडून प्रवेश

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. बँकेतील लॉकर ही गॅस कटरच्या सहाय्याने कट केले. लॉकरमध्ये ठेवलेली सात लाख रुपयांची रोकड चोरट्याने पळवून नेली. शिवाय बँकेतील महत्त्वाची कागदपत्रं आणि दस्त ऐवजही चोरट्यांनी जाळून टाकले आहेत.

पोलीस घटनास्थळी, चोरांचा शोध सुरु

ही घटना आज सकाळी येथील ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर याची माहिती सांगोला पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी राजेश्री पाटील, सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप आदींसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

जालन्यात बँकेवर दरोडा

कालच्याच दिवशी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड येथे बुलडाणा अर्बन बँकेच्या शाखेवर भर दिवसा सशस्त्र दरोडा पडला होता. आरोपींनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत बँकेतील पैसे आणि लॉकरमधील दागिने लंपास केले आहेत. ही 28 ऑक्टोबर रोजी दुपारी घडली होती. तीन बंदूकधारी आरोपी बँकेत शिरले. त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत 25 लाख रुपये आणि मोठ्या प्रमाणावर लॉकरमधील सोने लंपास केले.

संबंधित बातम्या :

जालन्यात बुलडाणा अर्बन बँकेवर सशस्त्र दरोडा, बंदुकीचा धाक दाखवत भर दिवसा बँक लुटली

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.