सोलापूर : ड्रेनेज लाईनचे काम करत असताना सोलापुरात झालेल्या दुर्घटनेतील (Solapur Drainage Accident) मृतांचा आकडा वाढला आहे. एका मजुराला वाचवण्यासाठी एकामागून एक गेलेले सहा जण ड्रेनेजमध्ये पडले होते. त्यापैकी चौघा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अक्कलकोट रस्त्यावरील सादुल पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली होती.
ड्रेनेजचे काम करताना सुरुवातीला तीन मजूर ड्रेनेजमध्ये पडले होते. एक कामगार पडल्यानंतर, दुसरा त्याला वाचवायला गेला होता. दुसराही बराच वेळ बाहेर न आल्यामुळे तिसरा मजूर त्यांच्या बचावासाठी गेला होता. अशाप्रकारे एकामागून एक सहा मजूर ड्रेनेजमध्ये पडले होते.
जिल्ह्यात अक्कलकोट सोलापूर राज्य मार्गाचे काम सुरु आहे. यावेळी सादुल पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली होती.
एकूण 6 जण ड्रेनेजमध्ये पडले होते, त्यापैकी चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशी माहिती सोलापूरच्या पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांनी दिली आहे. ड्रेनेज दुरुस्तीसाठी मॅनहॉलमध्ये मजूर आत गेला होता. मजूर बाहेर आला नाही म्हणून एका मागे एक असे 6 जण गेले, असं कुडकर यांनी सांगितलं. सर्व जण हे परराज्यातील मजूर असून एकूण चौघा जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोघे जण जखमी आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
संबंधित बातम्या :
Pune Firing | भर चौकात गोळीबार, पुण्यात तरुणाची हत्या, जुन्या वादातून काटा काढला?
चुलत बहिणीशी अनैतिक संबंध ठेवल्याचा राग, भावांकडून 32 वर्षीय प्रियकराची हत्या
रिक्षा चोरणाऱ्या टोळीला अटक; 14 रिक्षा जप्त, कवडीमोल भावाने करत होते वाहनांची विक्री