सोलापूर : सोलापूर शहरातील लकी चौकात असलेल्या गणेश रामचंद्र आपटे या सराफ दुकानात खरेदीसाठी आलेल्या महिला ग्राहकाच्या पाटल्यांची चोरी झाली. बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास झालेली चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावेळी तीन महिला चोरांच्या सोबत एक लहान मुलगाही दिसत आहे.
बॅगेतून पाटल्या लंपास
सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील राजस्व नगरातील प्रभावती ज्ञानोबा शिरगिरे या आपल्या पाटल्या बदलून घेण्यासाठी लकी चौकातील गणेश रामचंद्र आपटे या सराफ दुकानात गेल्या होत्या. पाटल्या त्यांनी बॅगेत ठेवल्या होत्या, मात्र त्या दुकानात राखी पाहत असताना त्याच वेळेस त्यांच्या बॅगेतून या पाटल्या महिला चोरांनी चोरल्या.
चोरी करुन महिला पसार
ही घटना सराफ दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेली आहे. पाटल्या चोरून महिला तिथून लगेच पसार झाल्या. घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे पोलिस दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेराची क्लिप पाहून चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
पाहा व्हिडीओ :
नगरमध्ये लहान मुलाच्या माध्यमातून फसवणुकीचा प्रयत्न
दुसरीकडे, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील बँक कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे तब्बल 50 लाख रुपयांची लूट होताना वाचली. गाडीतून ऑईल गळत असल्याचं खोटं सांगून लहान मुलाने कर्मचाऱ्याचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सतर्कता बाळगत कर्मचाऱ्याने रोकड गाडीत ठेवली आणि 50 लाखांची लूट टळली. कर्जत पोलिसांकडून संबंधित बँक कर्मचाऱ्याचा सत्कार करण्यात आला.
संबंधित बातम्या :
साताऱ्यातील पैलवानांसह नाशिकच्या तरुणाचा केरळातील बँकेवर दरोडा, साडेसात किलो सोन्याची लूट
गाडीतून ऑईल गळती, लहान मुलाने गंडवलं, बँक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने 50 लाखांची लूट टळली