पत्नीसह दोघांची हत्या, जन्मठेप भोगणारा वृद्ध पॅरोलवर बाहेर, पुन्हा एकाचा धारदार शस्त्राने खून

सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे ही घटना घडली. आमसिद्ध पुजारी असे 65 वर्षीय आरोपीचे नाव आहे. त्याने ज्ञानदेव प्रभू नागणसूरे नावाच्या 55 वर्षीय इसमाचा खून केला.

पत्नीसह दोघांची हत्या, जन्मठेप भोगणारा वृद्ध पॅरोलवर बाहेर, पुन्हा एकाचा धारदार शस्त्राने खून
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Oct 19, 2021 | 1:08 PM

सोलापूर : दोन हत्या प्रकरणात दुहेरी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीने तिसरी हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धारदार शस्त्राने वार करुन आरोपीने तिसरा खून केला. सोलापुरातील 65 वर्षीय आरोपी पॅरोलवर तुरुंगाबाहेर होता.

55 वर्षीय इसमाचा खून

सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे ही घटना घडली. आमसिद्ध पुजारी असे 65 वर्षीय आरोपीचे नाव आहे. त्याने ज्ञानदेव प्रभू नागणसूरे नावाच्या 55 वर्षीय इसमाचा खून केला. धारदार शस्त्राने डोकं, मान, गुडघ्यावर वार करुन पुजारीने नागणसूरेंचा जीव घेतला.

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या

याआधी आमसिद्ध पुजारीने स्वतःच्या पत्नीचा खून केला होता. चारित्र्याच्या संशयावरून सात वर्षांपूर्वी डोक्यात दगड घालून त्याने बायकोची हत्या केल्याचा आरोप होता. तर पंधरा वर्षापूर्वी अंत्रोळी येथील लक्ष्मण सलगरे नामक इसमाचा पत्नीबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्याने खून केला होता.

खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर गावात आला होता. आरोपी आमसिद्ध पुजारी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

कोल्हापुरात एकाची हत्या, सहा जण जेरबंद

दुसरीकडे, धारदार शस्त्राने संतोष श्रीकांत जाधव (वय 42 वर्ष, रा. जवाहरनगर) यांचा निर्घृण खून करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले. टोळीतील सहा जण कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज परिसरात सापडल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक बाबुराब महामुनी यांनी दिली. शनिवारी रात्री सशस्त्र हल्ला करुन संतोष जाधवांची हत्या करण्यात आली होती.

कोणाकोणाला अटक

शुभम बाळासो काणे (वय 24 वर्ष), निखिल चंद्रकांत माने (वय 21 वर्ष), विपुल आप्पासो नाईक (वय 20 वर्ष), अभिषेक राजू आसाल (वय 21 वर्ष) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या चौघा जणांना न्यायालयाने 25 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

संबंधित बातम्या :

वसईत पोलिसांची दादागिरी; दुकानात शिरुन दुकानदाराला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

यॅक यॅक, ईsss तुमचा आवडता समोसा कसा बनवला जातोय बघा, कल्याणच्या हॉटेलचा Video व्हायरल

डॉ. राजन शिंदेंचं नेमकं काय झालं? एका रक्तांकित खुनाचा चक्रावून टाकणारा घटनाक्रम, घराला आरसा दाखवणारी घटना

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.