घरफोड्या करणाऱ्या चार चोरट्यांचा भांडाफोड, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त, सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई
सोलापुरात घरफोडी आणि वाहनांची चोरी करणाऱ्या चार चोरट्यांना (Solapur Police Arrest Four Thief) सोलापूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
सोलापूर : सोलापुरात घरफोडी आणि वाहनांची चोरी करणाऱ्या चार चोरट्यांना (Solapur Police Arrest Four Thief) सोलापूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. याप्रकरणातील आरोपींनी अनेक ठिकाणी घरफोडी केल्या आहेत. तसेच, ते दुचाकींची चोरीही करायचे. या चोरट्यांकडून तब्बल दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे (Maharashtra Crime News Solapur Police Arrest Four Thief Who Robbed Houses).
सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घरफोडीचे पाच गुन्हे आणि मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघड केले आहेत. यावेळी पोलिसांनी विद्युतपंप, मोटरसायकलसह सोने, चांदीचे दागिन्यांची चोरी करणाऱ्या चार आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 2 लाख 8 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई
सोलापूर पोलिसांना घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगार संबंधित माहिती मिळाली. त्या अनुषंगाने आरोपी संतोष मच्छिंद्र चव्हाण राहणार तळे हिपरगा याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चार घरफोड्या केल्याचं उघड केले.
त्याच्याकडून 35 ग्राम सोने आणि 32 ग्राम चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. दुसरा संशयित आरोपी इसाक उर्फ डॅनी कययूंम शेख राहणार नई जिंदगी शोभादेवी नगर सोलापूर आणि साथीदार हमीद गफार जमादार राहणार नई जिंदगी शोभादेवी नगर सोलापूर यांनी एक घरफोडी करुन 40 हजार किमतीचे दोन विद्युतपंप चोरल्याची कबुली दिली.
तर संशयित आरोपी शरणाप्पा इकळग्गी राहणार पद्मनगर कर्णिक नगर याने दोन मोटरसायकली चोरल्या असून याच्याकडून 1 लाख 45 हजार किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अशी एकूण 2 लाख 8 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
नवी मुंबईत जबरी घरफोडी
नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 4 येथे वास्तव्यास असलेले प्रकाश शेट्टी यांचं घर काही दिवसांपासून बंद होते. याचा फायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातून (Navi Mumbai Burglary) सुमारे 4 लाख 80 हजार रुपये किमतीचं सोनं लंपास केलं होतं.
हाताला तेल लावून दाराची कडी तोडली
तर वसईत वसईत एका वकिलाच्या घरी चोरांनी तब्बल साडे चार लाखांची चोरी केली. या चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या चोरट्यांनी हाताला तेल लावून चक्क दाराच्या कडीमध्ये हात घालून कडी कोयंडा तोडला. त्यानंतर त्यांनी घरात प्रवेश केला. या चोरट्यांनी घरातील दीड लाख रक्कम रोख आणि 7 तोळे सोने लंपास केलं आहे. सध्या हे चोरटे फरार आहेत.
नवी मुंबईत जबरी घरफोडी, ऐरोलीत घराचे दोन कुलूप उचकटून 4 लाखांचं सोनं लंपासhttps://t.co/oZ1YhCAgu5#NaviMumbai #Crime #burglary
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 2, 2021
Maharashtra Crime News Solapur Police Arrest Four Thief Who Robbed Houses
संबंधित बातम्या :
हाताला तेल लावून दाराचा कोयंडा तोडला, 7 तोळे सोन्यासह साडे चार लाख लंपास, चोरटे सीसीटीव्हीत कैद
इंधन दरवाढ होताच चोरांची चांदी, नवी मुंबईत गाडीतून पेट्रोल चोरीची घटना CCTV मध्ये कैद
इंदापुरातून चोरीला गेलेले 29 फ्रीज परभणीत सापडले
अहमदनगरमध्ये दरोडा अन् बीडमध्ये सोन्याची विक्री, दरोडेखोरास बेड्या