सोलापुरात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा दगडावर डोकं आपटून खून, आरोपीला बारा तासात अटक
सोलापुरात काल एक धक्कादायक हत्येची घटना पुढे आली होती (Solapur Youth Murder Case). सोलापुरात एका तरुणाचं दगडावर डोकं आपटून निर्घृण खून करण्यात आला होता.
सोलापूर : सोलापुरात काल एक धक्कादायक हत्येची घटना पुढे आली होती (Solapur Youth Murder Case). सोलापुरात एका तरुणाचं दगडावर डोकं आपटून निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी सोलापूर पोलिसांनी आरोपीला अवघ्या बारा तासात अटक केली आहे (Maharashtra Crime News Solapur Youth Murder Case Solved In Just 12 Hours Accused Arrested).
सोलापूर शहराजवळ असलेल्या मुळेगाव शिवारात एका तरुणाचा दगडावर डोके आपटून निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी (3 मार्च) सकाळी निदर्शनास आली होती. याप्रकरणी मारेकऱ्याला शोधण्यास सोलापूर ग्रामीणच्या तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यश आलं आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि गावकरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर अवघ्या 12 तासात पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलं आहे. रवी बाबू रणखांबे असे आरोपीचे नाव असून त्याला सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
सोलापूर शहराजवळ असलेल्या मुळेगाव शिवारात काल सकाळी सुरेश बबन गायकवाड या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली होती. या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आहे.
रात्री घरातून निघाला तो परतलाच नाही
मृत सुरेश गायकवाड हा भाड्याची रिक्षा चालवत होता. मंगळवारी (2 मार्च) रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास दोन मित्रांनी सुरेशला घरातून बाहेर बोलावून घेतले. रात्री घराबाहेर गेलेला सुरेश रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने त्याचा लहान भाऊ आणि आईने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेश गायकवाडचा मृतदेह शेतात आढळून आल्याचं काही लोकांनी त्याच्या घरच्यांनी सांगितलं. सुरेशच्या डोक्याला मोठी जखम दिसून आली आणि बाजूला दगड पडल्याचेही दिसून आले.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, तसेच गावकर्यांकडे विचारपूसही केली. त्यानंतर रवी रणखांबे याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने खुनाची कबुली दिली आहे. पूर्वी झालेल्या वादाच्या भरात हा खून केल्याचं पोलीस तपासात रवीने सांगितलं.
चंदूचा मर्डर कर, मी तुला शय्यासुख देते, मित्राच्या प्रेयसीकडून सुपारी, बालमित्राची हत्या https://t.co/bFjUkszLzl #Nagpur | #Murder | #CrimeNews | #Boyfriend | #Girlfriend | #ChanduMahapur
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 4, 2021
Maharashtra Crime News Solapur Youth Murder Case Solved In Just 12 Hours Accused Arrested
संबंधित बातम्या :
आर्थिक वाद टोकाला, नालासोपाऱ्यात चाकू भोसकून पत्नीची हत्या
रिक्षाचालकाची हत्या, कॉन्स्टेबल पत्नीला अटक, पत्नीच्या पोलीस प्रियकरालाही बेड्या!