पैशांच्या वादातून भंडाऱ्यात कंत्राटदाराची हत्या; मृतदेह कालव्यामध्ये फेकला
भंडारा पवनी मार्गावरील दवडीपार येथील दर्गा परिसराच्या मागे असलेल्या कालव्यात (Contractor Murdered And His Body Thrown In Canal) आज सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.
भंडारा : भंडारा पवनी मार्गावरील दवडीपार येथील दर्गा परिसराच्या मागे असलेल्या कालव्यात (Contractor Murdered And His Body Thrown In Canal) आज सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कारधा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिसराचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी मृतदेह आढळून आलेल्या नहराच्या पाळीवर रक्त सांडलेले आढळले (Maharashtra Crime News The Contractor Murdered And His Body Thrown In Canal At Bhandara).
यावरुन सदर इसमाचा मृत्यू आकस्मिक नसून त्याचा खून करण्यात आल्याचा संशय कारधाचे ठाणेदार दीपक वानखेडे यांना आला. परिस्थितीजन्य पुराव्यावरुन आणि तिथे आढळलेल्या मोबाईलवरुन मृतकाची ओळख पटली. यात सदर मृतदेह हा खात रोडवरील म्हाडा कॉलनी येथील नीलकंठ फागोजी बाहे (वय 50) यांचा असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला असून अधिक तपास ठाणेदार दीपक वानखेडे करीत आहे.
मृतक कंत्राटदार रात्रीपासून बेपत्ता
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक नीलकंठ बाहे हे दुरसंचार विभागातील कामे ठेकेदारी पध्दतीने करत असत. ते काल बुधवारी (17 मार्च) रात्री दहा वाजेपासून ते बेपत्ता असल्याची माहिती आहे. नीलकंठ बाहे यांची हत्या झाली, अशी एकच चर्चा संपूर्ण शहरात सुरु आहे. घटना स्थळी भंडारा स्थानिक गुन्हे शाखेचे जयवंत चौहान तसेच कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक वानखेडे तपास करत आहेत.
मृतक हा कंत्राटदार असल्यामुळे पैशांचा व्यवहारातून त्याची हत्या झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
नागपुरात गाजलेल्या निमगडे खून प्रकरणात 5 वर्षांनी मोठा खुलासा; कुख्यात गुंडांचा सहभाग उघडhttps://t.co/sVM3WS26aV#NagpurCrime #NagpurMurderCase #EknathNimgadeMurder
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 18, 2021
Maharashtra Crime News The Contractor Murdered And His Body Thrown In Canal At Bhandara
संबंधित बातम्या :
बीडमध्ये वृद्धाचा चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, गुन्हा दाखल करण्यात पोलिसांकडून दिरंगाई
डॅशिंग अधिकारी शिवदीप लांडे ATS कार्यालयात, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी महत्त्वाची चर्चा